Raj Thackeray News : राज यांनी दिलेला शब्द पाळला, इतिहास संशोधक मंडळाला लाखोंची देणगी अन् 'ही' भेट

Board of Historical Research : कामाबाबत समाधान व्यक्त करत 25 लाखांची देणगी, इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला शनिवारी भेट दिली. या वेळी त्यांनी इतिहास संशोधक मंडळातील ऐतिहासिक ठेव्याबाबत जाणून घेतले. तसंच संशोधक मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत 25 लाखांची देणगीदेखील देऊ केली. तसेच राज ठाकरेंनी बाबरी मशिदीचा जो ढाच्या पाडण्यात आला, त्याची विट इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, भारत संशोधक मंडळात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला कारण पण तसे आहे. प्रत्येक भारतीयांनी नजरेखालून घातला पाहिजे, असा महाराष्ट्राकडे हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्राकडे इतिहास आहे. मात्र, बाकीच्यांकडे फक्त भूगोल आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

Raj Thackeray
Balasaheb Thackery : स्व. बाळासाहेब ठाकरे....रुद्राक्षमाळा आणि उद्धव ठाकरे!

बाबासाहेब पुरंदरे हे सांगायचे इतिहास का वाचावं, कारण वर्तमान कसा जगावा आणि भविष्यात कसं जगायला हवं हे इतिहास तुम्हाला समजून सांगत असतो. इतिहासात केलेल्या चुका या पुन्हा करू नये आणि इतिहासात उभे केलेले आदर्श आत्मसात करता यावेत, यासाठी प्रत्येकाने इतिहास वाचला पाहिजे. खास करून महाराष्ट्राचा इतिहास तर वाचलाच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, आज इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली. या वेळी ऐतिहासिक ठेवा पाहताना हे सगळं वाचलं पाहिजे, वाढलं पाहिजे अशी कुठेतरी भावना मनात आली. म्हणून माझ्याकडून काहीतरी करता यावं, यासाठी 25 लाखांची देणगी देत असल्याचं ठाकरे यांनी जाहीर केलं. महाराष्ट्राचा इतिहास हा साधासुधा नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की, आपल्याला इतिहास कळला असा तो इतिहास नाही.

त्यामुळे काही चुका झाल्या असतील, त्या सुधारण्यासाठी इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे. यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानातील एक किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, पुरंदरे यांनी त्यांच्या परदेशातील परिचितांना परदेशात महापुरुषांचे पुतळे का नसतात, याबाबत विचारलं होतं, त्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला पुतळे उभारण्याची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटिशाच्या रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत.

त्यामुळे त्यांचा वेगळा जय जयकार करावा असं वाटत नाही. मात्र, आपल्या रक्तात इतिहास आणि महापुरुष शिरायचे आहेत. आपण आपल्या पुरुषांना जातीत पाहतो आणि जातीतून इतिहास वाचायला सुरुवात करतो. हे सध्याच्या महाराष्ट्राचे राजकारण आहे. याबद्दल मी बाहेर बोलेन असं ठाकरे म्हणाले, तर बाबरी पडली त्यावेळी बाळा नांदगावकर तिकडे होते. कारसेवेसाठी ते त्या ठिकाणी गेले होते.

त्यावेळी जो बाबरीचा ढाच्या पाडण्यात आला, त्याच्या दोन विटा त्यांनी आणल्या होत्या. त्यातील एक या मंडळाला दिली आहे. मंडळाने ती विट पाहवी त्याचं वजन पाहवं त्यातून त्या वेळची स्ट्रक्चर कशी उभी राहायची याचा अंदाज येईल. कारण एक हातोडा मारला आणि बाबरी मशीद पडली असं झालेलं नाही. कारण त्या काळातील कन्स्ट्रक्शन खूप मजबूत असायची. कारण त्यावेळी टेंडर्स निघायची नाहीत.

जो कमी बोली लावेल त्याला काम मिळायचे अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे या विटेवरती इतिहास संशोधक मंडळांनी संशोधन करावं आणि ती बाबराच्या काळातली आहे. तिथलीच कुठली तरी आहे किंवा हजारो वर्षे जुनी आहे, याबाबत उजेड टाकावा, असं राज ठाकरे म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

R

Raj Thackeray
Vidarbha's Congress Leader Join NCP : राष्ट्रवादीचा विदर्भात काँग्रेसला धक्का; वर्ध्यातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com