PCMC News : पुनावळेतील कचरा डेपोचा प्रश्न राज ठाकरेंच्या कोर्टात ; प्रकल्प रद्द करण्याच्या भूमिकेकडे लागले लक्ष

Raj Thackeray News : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला असला तरी त्यास विरोध करण्यासाठी आता नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत हा प्रकल्प रद्द करण्याचाही मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुनावळे, रावेत, ताथवडे भागातील नागरिकांनी भेट घेतली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे आता या प्रश्नावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसंदर्भात निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Raj Thackeray News
Hunger Strike : शिवरायांच्या साक्षीनं अकोल्याच्या गजाननाचा निर्धार; आरक्षण मिळेपर्यंत अन्न नाही घेणार

त्यामुळे पुनावळे, रावेत, ताथवडे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पुनावळे काटेवस्ती जवळील जंगलातील 22 हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तोडण्यात आली आहेत. त्यासोबतच पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असल्याने नागरिकांनी विरोध केला आहे.

या निर्णयाला विरोध करण्यासाठी गावातील नागरीकांनी राज ठाकरे यांची रविवारी भेट घेतली. यावेळी पुनावळे, हिंजवडी, मारुंजीमधील ग्रामस्थ आणि मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, शहर प्रमुख सचिन चिखले, उपशहर अध्यक्ष राजु सावळे, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुखे, मारुजी शहरअध्यक्ष सतोष कवडे उपस्थित होते.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, पुनावळे व जवळपास असणाऱ्या सर्व नागरिकांचा विचार करून पुनावळे परिसरात येणारा ह्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. येथील नागरीकांचे आयुष्य धोक्यात येणार नाही. याबाबत आपण लक्ष घालावे, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.

या कारणांमुळे कचरा डेपोस आहे विरोध

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सन 2008 मध्ये मंजूर केला. त्यावेळी एवढ्या प्रमाणात नागरिकरण नव्हते. मात्र, आता गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये येथे उभारले गेले आहेत. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे या सगळ्या गोष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पुनावळे परीसरात शहरीकरण झालेले आहे. सुमारे १ लाखाहून अधिक नागरिक पुनावळे येथे राहत आहेत.

नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आयटी पार्क आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा काही गृह प्रकल्पापासून केवळ दोनशे तीनशे मीटर अंतरावर आहे. डेपोमुळे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या शेजारीच आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोध केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Raj Thackeray News
Uddhav Thackeray : ''समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय?'' ; उद्धव ठाकरे कडाडले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com