Raj Thackeray News : रुपाली पाटलांना राज ठाकरेंच्या व्यासपीठावर मान मिळणार का ?

Pune Lok Sabha Constituency : मनसेमध्ये होत असलेली घुसमट आणि पक्षातील पदाधिकारी, सहकारीच विरोधात काम करत असल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती..
Rupali Patil - Raj Thackeray
Rupali Patil - Raj ThackeraySarkarnama

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या रूपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची महायुती आहे. या महायुतीला गेल्या महिन्यात मनसेने देखील आपला पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठींबा जाहीर केला आहे.

महायुतीचे पुणे (PUNE) शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात सभा होणार आहे. सारसबाग परिसरात ठाकरे यांची ही सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मनसेमध्ये घुसमट होत असल्याचे कारण पुढे करत मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या रुपाली पाटील या देखील महायुतीचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांना राज ठाकरेंच्या व्यासपीठावर मान सन्मान मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rupali Patil - Raj Thackeray
Narendra Dhabholkar Case : दोन गोळ्या डोक्यात... एक छातीत... धडाधड पाच गोळ्या झाडल्या अन् दाभोलकर कोसळले

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सभा ज्या भागात होत आहे, तेथून अगदी जवळच रुपाली पाटील यांचा भाग आहे. येथून मनसेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या होत्या.मनसेच्या स्थापनेपासून पुढे 14 वर्षे रुपाली पाटील या राज ठाकरे यांच्याबरोबर होत्या. त्या मूळच्या वकील आहेत. मनसेच्या तिकीटावर महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत त्या पुणे महापालिकेत नगरसेवक झाल्या. 2017 च्या महापालिकेच्या निडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतरही त्या राजकारणात सक्रिय राहिल्या. 2019 ची कसबा विधानसभेची निवडणूक मनसेकडून लढविण्यासाठी त्या इच्छूक देखील होत्या.

विधानसभेसाठी मनसेने (MNS) संधी न दिल्याने रुपाली पाटील नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी लक्षात घेत पक्षाने त्यांच्यावर महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, ही जबाबदारी पार पाडताना त्या अधिक आक्रमक झाल्या. त्यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यामध्येही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षातील नेत्यांनी साथ न दिल्याने पराभव स्वीकारावा लागला, अशी खंत त्या बोलून दाखवित होत्या. त्यानंतर पक्षाने त्यांचे शहराध्यक्षपद काढून घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी बोळवण केली होती. यामुळे देखील त्या नाराज झाल्या होत्या.

Rupali Patil - Raj Thackeray
Modi Vs Thackeray : पंतप्रधान बेअकल माणूस; ठाकरी शैलीत उद्धव ठाकरेंचा पलटवार

पक्षात होत असलेली घुसमट आणि पक्षातील पदाधिकारी, सहकारीच विरोधात काम करत असल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर देखील रुपाली पाटील यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत मनसेच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती.

आता त्याच मनसेने लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठींबा देत उमेदवाराच्या प्रचाराची सभा घेतली आहे. या प्रचार सभेच्या निमित्ताने अडीच वर्षांपूर्वी मनसेतून बाहेर पडलेल्या रुपाली पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर येणार आहेत. त्यावेळी ते एकमेकांशी काय बोलणार, अशी उत्सुकता मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना लागली आहे.

Rupali Patil - Raj Thackeray
Ajit Pawar News : 'ही बनवाबनवी आणि नौटंकी चालणार नाही', ठाकरेंच्या शिलेदारांवर अजितदादा कडाडले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com