Modi Vs Thackeray : पंतप्रधान बेअकल माणूस; ठाकरी शैलीत उद्धव ठाकरेंचा पलटवार

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी लढावे. माझ्या आई-वडिलांचा अपमान केला, तर आम्ही सहन करणार नाही. तुम्ही कोणीही असाल, तुमची जागा दाखवून देऊ.
Uddhav Thackeray-Narendra modi
Uddhav Thackeray-Narendra modiSarkarnama

Nagar, 10 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. ०९ मे) जहरी टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर पटलवार केला आहे. पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा नकली पुत्र म्हटले होते. यावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना बेअकल माणूस म्हटले आहे. ‘मला नकली पुत्र म्हणून पंतप्रधान यांनी माझ्या आई-वडिलांचा अपमान केला आहे. आता तुमची जागा दाखवून देणारच’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेला उद्धव ठाकरेंनी खरमरीत प्रत्युतर दिले. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार शंकरराव गडाख, शुभांगी पाटील, करण ससाणे, हेमंत ओगले उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Narendra modi
Ranjitsingh Naik Nimbalkar : माढ्यातून मोकळे झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे मोहिमेची जबाबदारी

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी माझ्याशी लढावे. माझ्या आई-वडिलांचा अपमान केला, तर सहन करणार नाही. तुम्ही कोणीही असाल, तुमची जागा दाखवून देऊ. मला नकली म्हणून तुम्ही माझा अपमान केलेला नाही. माझ्या देवतासमान आईवडिलांचा अपमान केला आहे. बाळासाहेबांचा अपमान आहे. मोदीजी तुमच्यावर आईवडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावर ते झाले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातील आहे. घराणेशाहीचे वावडे तुम्हाला असेल. पण मला त्याचा अभिमान आहे".

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात, त्यांना तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय. तेलंगणामध्ये गेले, तेथेही माझ्यावर टीका केली. अहो मी महाराष्ट्रात तुमच्याविरुद्ध उभा आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचे आईचे नाव सांगायला वाईट वाटत असेल.

तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदी, मतदानासाठी रांगेमध्ये उभे केले. हे पाप तुम्ही केलेत. नव्वादीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरले. तेवढा मी निर्दयी नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray-Narendra modi
Ranjitsinh Mohite Patil : माढ्याचे मतदान होताच रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा ॲक्टिव्ह; शिवरत्नवर बोलावली बैठक

आमचे हिंदुत्व हे पितृदेवो भव:, मातृदेवो भव:, गुरुदेव भव: हे सांगणारे आहे. बाळासाहेब, बाळासाहेब बोलण्यापूर्वी हिंदुहृदयसम्राट लावायला शिका. नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुमची जीभ वळत नसेल, तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल.

हे लोकशाही संपवायला निघालेत. त्यामुळे हुकुमशहासाठी एकसुद्धा मत नासता कामा नये. मशाल म्हणजे, मशालीलाच मत मिळालं पाहिजे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये हुकुमशाहीविरुद्ध आगडोंब पेटलाय.

तुम्ही लोकशाहीला अपशकुन करू नका. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचवण्यासाठी आम्ही हातामध्ये मशाल घेऊन मैदानात उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Uddhav Thackeray-Narendra modi
Amol Kolhe's Announcement : डॉ. अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; पुढची पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com