Vaishnavi Hagwane Case : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शरीरावर जखमा, 51 तोळं सोनं, चांदीची भांडी अन्...

Vaishnavi Hagwane Suicide Rajendra Hagwane : हगवणे कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करण्यात येत होता. तसेच तिचा पती शशांक याने जमीन खरेदीसाठी वैष्णवीला तिच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागण्यास सांगितले होते.
Scene from the home of Rajendra Hagwane where his daughter-in-law reportedly died by suicide; FIR cites dowry harassment.
Scene from the home of Rajendra Hagwane where his daughter-in-law reportedly died by suicide; FIR cites dowry harassment.sarkarnama
Published on
Updated on

Vaishnavi Hagwane News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी शुक्रवारी (ता.16) गळफास घेत आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या परिवारातील लोकांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केला त्यामुळे तिने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र हगवणेंची पत्नी,मुलगी आणि मुलगा शशांक यांना अटक केली आहे. तर, राजेंद्र हगवणे फरार आहेत.

हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी राजेंद्र हगवणे, त्यांच्य पत्नी, मुलगा शशांक आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी लग्नात घेण्यात आली तसेच तसेच सनीज् वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून करुन देण्याच्या बोलीवर लग्न करण्यात आले.

हगवणे कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करण्यात येत होता. तसेच तिचा पती शशांक याने जमीन खरेदीसाठी वैष्णवीला तिच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागण्यास सांगितले होते. पैसे न द्यायला तुझ्या बापाला भीक लागली आहे का? पैसे दिले नाही तर सगळ्यांचा काटा काढेल आणि तुला हकलून देईल, असे शशांकने म्हटले होते. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगिलते होते असा देखील उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

Scene from the home of Rajendra Hagwane where his daughter-in-law reportedly died by suicide; FIR cites dowry harassment.
Chhagan Bhujbal News: भुजबळांची 'एन्ट्री' अन् मुंडेंना 'दे धक्का'; फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'ची वाट खडतर; 'ही' आहेत कारणं

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ पती शशांक करत होता. ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवी गरोदर असताना हे बाळ माझे नाही दुसरे कोणाचे तरी असेल असे म्हणत शशांक आणि सासरच्या लोकांनी वैष्णवीला मारहाण केली होती. त्यानंतर माहेरी आल्यानंतर वैष्णवीचे विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पोस्टमार्टममध्ये काय?

ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा, जखमा आहेत. अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासनीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

महिला आयोगाकडून चौकशी

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणीची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Scene from the home of Rajendra Hagwane where his daughter-in-law reportedly died by suicide; FIR cites dowry harassment.
India Vs Pakistan : भारत-पाक संघर्षानंतर मंत्रिपदाचा पहिला राजीनामा मध्य प्रदेशातून? 8 दिवसांत फैसला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com