Rajgurunagar CEO Bribe : बिलाच्या दहा टक्के लाच घेणारा खेडचा सीईओ फरारच; दोन आरोपींना जामीन

Pune Crime News : एसीबीने पुणे शहरानंतर ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याने अधिकाऱ्यांना धसका...
Rajgurunagar Munciple Council, ACB
Rajgurunagar Munciple Council, ACBSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरावर लक्ष्य केलेल्या एसीबीने आपल्या कारवाईचा मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यांनी जिल्ह्यात राजगुरुनगर (ता. खेड) नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लाळगे याच्यासह अभियंता चारुबला राजेंद्र हरडे आणि अकाउंटंट प्रवीण गणपत कापसे या तिघांविरुद्ध कारवाई केली. त्यातील हरडे, कापसे यांना पोलिसांनी अटक केली. एक दिवस तुरुंगात राहून ते आता जामिनावर बाहेरही आले आहेत. मात्र, या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी लाळगे अद्याप फरार आहे. त्यास अटक कधी होतेय, याकडे खेडचे लक्ष आहे. (Latest Political News)

Rajgurunagar Munciple Council, ACB
Shrikant Shinde Vs Aditya Thackeray : 'आदित्य यांनी त्यांच्या पप्पांना प्रश्न विचारला पाहिजे'; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला

नगरपरिषद कार्यालयातच लाच घेण्याचे धाडस महिला इंजिनिअर हरडे यांनी केले होते. आपल्याच एका ठेकेदाराकडून त्याचे ८० हजारांचे बिल पास करण्यासाठी त्याच्या दहा टक्के लाच म्हणून मागून ती घेतली होती. ती घेण्यास त्यांना लाळगे आणि कापसेने प्रवृत्त केल्याने त्यांच्याविरुद्धही लाचखोरीचा हा गुन्हा खेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. हरडेनंतर कापसेलाही त्यात एसीबीने पकडले. त्यांना पोलिस कोठडी झाली. यानंतर त्यांना जामीन मिळाला. तरी, अद्याप लाळगे पकडला गेलेला नाही. तो फरार झाला असल्याचे एसीबीने सांगितले. (ACB News)

तक्रारदार ठेकेदाराने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला लागणारे साहित्य पुरविले होते. त्याचे ८० हजार ७३० रुपयांचे बिल त्यांनी नगरपरिषदेला दिले. ते काढून देण्यासाठी बिलाच्या दहा टक्के लाच सीईओ लाळगेने मागून ती हरडेमार्फत घेतली होती. पुणे रेंज एसीबीच्या अॅडिशनल एसपी डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. एसीबीचे पीआय रूपेश जाधव पुढील तपास करीत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Rajgurunagar Munciple Council, ACB
Dhangar Reservation Protest : धनगर आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार; गिरीश महाजनांची मोठी माहिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com