पवारांच्या बालेकिल्ल्यातून राजू शेट्टींचा पुन्हा एल्गार...!

इंदापुरातील छत्रपती साखर कारखाना परिसरात २० एप्रिल रोजी राजू शेट्टींची जाहीर सभा
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

वालचंदनगर (जि. पुणे) : महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात (पुणे जिल्हा) येत आहेत. नीरा खोऱ्यातील भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात येत्या बुधवारी (ता.२० एप्रिल) त्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे ही सभा पवारांचे एकेकाळचे समर्थक आणि सध्या ‘छत्रपती’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर उभा दावा मांडलेले पृथ्वीराज जाचक यांनी आयोजित केली आहे, त्यामुळे एफआरपीच्या मुद्यासह शेतकरी प्रश्नावर शेट्टी कोणता संदेश देतात, याकडे पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Raju Shetty's public meeting on 20th April at Chhatrapati Sugar Factory in Indapur)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय मागील आठवड्यात कोल्हापुरातील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केला. त्यावेळी त्यांनी महाआघाडीसह भाजपवर निशाणा साधत ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर फिरून पक्षसंघटना बांधणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले आहे.

Raju Shetti
मॉन्सूनचा सांगावा...तयारीला लागा! : यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. राज्य सरकारने उसाच्या ‘एफआरपी’चे तुकडे पाडले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना असून त्या राज्यभर आवाज उठविणार आहेत. एकरकमी एफआरपी मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे.

Raju Shetti
केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार करण्याचा शब्द देणाऱ्या सोनवणेंना अजितदादा कोणते बक्षीस देणार?

इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या सभेमध्ये राजू शेट्टी एकरकमी एफआरपीसह भूमी अधिग्रहण कायद्यावर बोलणार आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कोरोना आणि न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यामुळे पुढे ढकलली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान संचालक मंडळावर आरोप करत विरोधात आंदोलने केली होती. सध्या जाचक संचालक मंडळाच्या विरोधामध्ये दंड थोपटून आहेत. राजू शेट्टी यांच्या सभेमुळे जाचक यांच्यासह शेतकरी कृती समितीला प्रोत्साहन आणि उभारी मिळणार आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाच्या विरोधकांना बळ मिळणार आहे.

Raju Shetti
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शेट्टी यांच्या सभेच्या नियोजनाची तयारी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून जाचक यांनी करण्यास सुरूवात केली आहे. येत्या बुधवारी (ता. २० एप्रिल) कारखान्याच्या पालखी मैदानावर शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे बारामती, इंदापूरचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com