केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार करण्याचा शब्द देणाऱ्या सोनवणेंना अजितदादा कोणते बक्षीस देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभा लढविलेला एकही उमेदवार पक्षात राहिलेला नाही.
Bajrang Sonawane-Ajit Pawar
Bajrang Sonawane-Ajit PawarSarkarnama

बीड : बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) लोकसभेची निवडणूक लढविली. त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतरही त्यांनी केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करू, अशी ग्वाही खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांच्यासमोर दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता त्यांना काय देणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. (Which reward will the NCP give to Bajrang Sonawane?)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभा लढविलेल्या आणि भाजपला टक्कर देताना घायाळ झालेल्या उमेदवारांना पक्षाने काही बक्षीसी दिल्याचे आतापर्यंत उदाहरण नाही. विशेष म्हणजे पक्षाकडून लोकसभा लढविलेला एकही उमेदवार पक्षात राहिलेला नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने पाच लोकसभा लढविल्या आणि एकदा विजय मिळाला. यात दोन अपवाद झाले. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जयसिंगराव गायकवाड एकमेव राष्ट्रवादीचे जिल्ह्यातून एकदा खासदार राहिले आहेत. त्यानंतर त्यांनीही पक्ष सोडला. मात्र, शिवसेना आणि भाजप अशी दुहेरी खेप करुन आता ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. तर, राधाकृष्ण होके पाटील, सुरेश धस, रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढविल्या. मात्र, आता हे सगळेच भाजपमध्ये आहेत.

Bajrang Sonawane-Ajit Pawar
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दरम्यान, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले बजरंग सोनवणे यांनी आव्हान दिले होते. शेतकरी पुत्र म्हणून त्यांनी जिल्ह्यात हवाही केली होती. मात्र, त्यांचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभव झाला. त्यामुळे पक्षाकडून पूर्वीचा इतिहास मोडून बजरंग सोनवणे यांना काही तरी बक्षीसी मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात भरभरून यशही मिळाले. जिल्हा परिषदेतही सत्तांतर झाले. जिल्हा परिषदेतील सत्तांतर तर आपल्यामुळेच झाल्याचा दावा खुद्द बजरंग सोनवणे यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला. एवढ्यावरच न थांबता केज मतदार संघातून राष्ट्रवादीचा आमदारही विजयी करू, अशी ग्वाही त्यांनी या दोघांसमोर दिली आहे.

Bajrang Sonawane-Ajit Pawar
मलिकांची मालमत्ता जप्त झाल्यानंतर वानखेडे दुसऱ्याच दिवशी माध्यमांसमोर आले अन्...

त्यानंतर भाषणात खुद्द अजित पवार यांनी बजरंग सोनवणे यांचे जिल्हाध्यक्षपद गेले असले तरी पक्षाच्या व प्रांताध्यक्षांच्या काही वेगळे मनात असू शकते, लवकरच त्यांना काही तरी मोठी संधी मिळेल, म्हणून बजरंग सोनवणेंच्या समर्थकांच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या आहेत. मग, आता विधान परिषदेच्या जून महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांत पक्ष त्यांना संधी देणार की राज्यपाल नियुक्त १२ जागांत संधी देणार, हे पाहावे लागेल. बजरंग सोनवणे यांची साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत केज तालुक्यात ताकद आहे. आता त्यांना पक्ष आणखी काय पाठबळ देणार, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com