Raksha Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, महिला आयोग आक्रमक; कोथळीच्या जत्रेत नेमकं काय झालं?

Women Commission on Raksha Khadse Daughter Molestation Case : रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी बसल्या असताना काही टवाळखोरांनी त्यांचा व्हिडिओ आणि काही फोटो काढले.यावेळी खडसे यांचे सुरक्षा रक्षकही त्यांच्या मुलीसोबत होते.
Raksha Khadse Daughter Molestation News
Raksha Khadse Daughter Molestation NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच जर सेफ नसेल तर राज्यातील सामान्य मुलांची परिस्थिती काय असेल ? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, "केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी मुक्ताईनगर येथील पी आय यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. जो टवाळखोर आहे, त्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून या प्रकरणात देखील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस पथके त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. टवाळखोरांच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील, जे यात दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,"

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Raksha Khadse Daughter Molestation News
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे दिला राजीनामा; करूणा शर्मा यांचा दावा

शुक्रवारी रात्री कोथळीच्या जत्रेत हा प्रकार घडला आहे. यात्रेतील पाळण्यामध्ये रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी बसल्या असताना काही टवाळखोरांनी त्यांचा व्हिडिओ आणि काही फोटो काढले.यावेळी खडसे यांचे सुरक्षा रक्षकही त्यांच्या मुलीसोबत होते. सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना हटकले देखील होतं आणि त्यांचा मोबाईल देखील काढून घेतला होता. त्यावेळी टवाळखोर आणि सुरक्षा रक्षकामध्ये बाचाबाची देखील झाली होती.

"यापूर्वीही संबधीत टवाळखोरवर गुन्हा दाखल आहे, या प्रकरणी त्याला शिक्षादेखील झाली आहे. या प्रकरणांमध्ये देखील त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत, हिंस्र श्वापदे आहेत, यांचे चेहरे आता समोर आणली पाहिजेत. काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे. ही विकृती कमी झाली पाहिजे, यासाठी निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करू," असं चाकणकर म्हणाल्या.

"मुख्यमंत्री, महिला आयोग, पोलिसांनी नक्कीच दखल घेतली असून यावर कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकरणामध्ये मिडिया ट्रायल न करता, पोलिस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे," असे चाकणकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com