Ramdas Athawale News : रामदास आठवलेंचा पाराच चढला अन् एका फोनवरच कार्यकारिणी बरखास्त !

Pimpri Chinchwad RPI : पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकारिणीचे कामच नसल्याच्या थेट आठवलेंकडे तक्रारी
Ramdas Athwale
Ramdas AthwaleSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale Dismiss Pimpri RPI Executive : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तथा 'आरपीआय'ची पिंपरी-चिंचवडमध्ये फारशी ताकद नाही. त्यामुळे पक्षाचा एकही नगरसेवक गत टर्ममध्ये नव्हता. त्यात आता पक्षाची शहर कार्यकारिणीच राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी (ता. १७) तडकाफडकी बरखास्त केली. त्यामुळे अगोदरच तोळामासा प्रकृती असलेल्या या पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खाते उघडण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहेत. (Latest Political News)

Ramdas Athwale
BJP District President News : शिंदेंना निष्ठेचे फळ मिळाले, आता जिल्हा भाजपची सूत्रे हाती..

'आरपीआय'च्या कार्यकारिणीचे शहरात काहीच काम नाही. त्यांनी एक आंदोलनही केलेले नाही. परिणामी पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्योगनगरीत निर्माण झाल्याच्या तक्रारी थेट आठवलेंकडे काही निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी शहराची कार्यकारिणीच बरखास्तीचे टोकाचे पाऊल उचलले.

या बरखास्तीच्या कारवाईबाबत आठवले यांनी प्रदेशाध्यक्ष सुधाकर ऊर्फ राजा सरवदे यांना मोबाईलवरून आदेश दिला. याबाबत 'सरकारना'माशी बोलताना सरवदे म्हणाले, "पिंपरीच्या कार्यकारिणीविरुद्ध आठवलेंकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तक्रारी या थेट रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आल्याने त्यांचे स्वरुप काय हे सांगता येणार नाही."

Ramdas Athwale
Uddhav Thackeray & Neelam Gorhe News : ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर नीलम गोऱ्हेंची पहिली चिठ्ठी ; पण...

दरम्यान, बरखास्त कार्यकारिणीच्या जागी चौघांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्यात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर वारभुवन आणि वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांचा समावेश आहे. शहराची नवीन कार्यकारिणी एका महिन्य़ात निवडण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे.

Ramdas Athwale
Dapoli Sai Resort: दापोलीतल्या साई रिसॉर्टला 'ईडी'ने टाळे ठोकले

जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे कामच नाही, संपर्क नाही, त्यात एकही आंदोलन घेतले गेले नसल्याने कोणी दखलच पक्षाची घेत नव्हते. यामुळे आता लवकरच शहरातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने पक्षाची बैठक घेऊन भूमिका घेणार आहोत. क्रियाशील सभासद नोंदणी लगेच सुरु करणार आहोत. काम करणाऱ्याला कार्यकर्त्याला पदे देणार आहे. पक्षबांधणीचे काम जोमाने करणार आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com