BJP District President News : शिंदेंना निष्ठेचे फळ मिळाले, आता जिल्हा भाजपची सूत्रे हाती..

Marathwada : रामराव वडकुते यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी या पदावर दावा केला होता.
BJP District President News
BJP District President NewsSarkarnama

Hingoli : गेल्या ३२ वर्षापासून पक्षासोबत एकनिष्ठ असलेले फुलाजी शिंदे यांना अखेर निष्ठेचे फळ मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फुले यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. (BJP District President News) भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहचलेल्या फुलेंमुळे सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

BJP District President News
Monsoon Session News : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याइतकेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व..

हिंगोली (Hingoli) तालुक्यातील सावा येथील ते रहिवासी असुन मुळचे शेतकरी आहेत. आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. (BJP) मुटकुळे यांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. त्यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढविली नाही. मात्र त्यांनी भाजपामध्ये अनेक पदांवर काम केले.

सावा येथील भाजप शाखेचे शाखाध्यक्ष, हिंगोली तालुका सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, व जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. (Marathwada) पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या अनेक सदस्यांच्या विजयात देखील त्यांचा वाटा आहे. ३२ वर्षापासून पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे पक्षाने त्यांची दखल घेत त्यांच्यावर आता जिल्ह्याची जबाबदारी दिली.

दरम्यान विद्यमान अध्यक्ष रामराव वडकुते यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी या पदावर दावा केला होता. त्यानंतर या संदर्भात पक्षातर्फे चाचपणी देखील झाली. मध्यतंरी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे काही दिवस विद्यमान अध्यक्षांनी कारभार सांभाळला.

आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुकत्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केल्या. यामध्ये हिंगोली जिल्ह्याध्यक्ष पदाची माळ फुलाजी शिंदे यांच्या गळ्यात टाकण्यात आली. विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे समर्थक अशी ओळख असलेल्या शिंदे यांच्या नियुक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीत मुटकुळे यांना अधिक फायदा होणार असल्याचे बोलले जाते. स्पर्धेत अनेक नावे चर्चेत असतांना शिंदे यांनी या सर्वांवर मात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com