Assembly Election 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून बागवे पिता-पुत्राची तिकीटासाठी रस्सीखेच?

pune cantonment assembly constituency : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दहा जण लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट कोणाला तिकीट मिळते? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
ramesh bagwe | avinash bagwe
ramesh bagwe | avinash bagwesarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील 288 जागांवरील इच्छुकांचे अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची अंतिम मुदत आता संपली आहे. पुणे शहरामधील सात विधानसभा मतदारसंघात तब्बल 24 जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकसभेला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला ( Congress ) आघाडी मिळाली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधून विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. तब्बल 10 जणांनी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

तर, काँग्रेस वरिष्ठांनी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर पुणे काँग्रेस भवनात सात जणांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात सुनील तात्याराम भोसले, छाया बाळकृष्ण जाधव, रवींद्र रंगनाथ आरडे, लताबाई दयाराम राजगुरू, सुजित लक्ष्मण यादव, मिलिंद दत्ता अहिरे यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त काही जणांनी पुणे काँग्रेस भवनात अर्ज न करता थेट मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात अर्ज केला असल्याचं समोर आलं आहे. माजी मंत्री, रमेश बागवे ( Ramesh Bagwe ) यांनी आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पुणे कॅन्टोन्मेंटमधून विधानसभा लढवण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे बागवे पिता-पुत्रापैकी यंदाच्या विधानसभेच्या मैदानात कोण उतरणार? याची चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

ramesh bagwe | avinash bagwe
Assembly Election 2024 : आघाडीच्या जागावाटपाचा तिढा वाढला, ठाकरेंच्या 'या' मित्रपक्षाने केली 25 जागांची मागणी

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राहिलेले रमेश बागवे हे पराभूत झाले आहेत. जयपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात दोनदा पराभूत झालेल्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही, असा ठराव करण्यात आला होता. तोच 'फॉर्म्युला' महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे. या 'फॉर्म्युल्या'च्या आधारावर रमेश बागवे यांना तिकीट मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास पुत्र अविनाश बागवे यांना कॅन्टोन्मेंटमधून उतरविण्यात येणार आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ramesh bagwe | avinash bagwe
Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंनी वाढवला भोसरीचा तिढा; शरद पवार राजी होणार का?

अविनाश साळवेंना तिकीट मिळणार?

रमेश बागवे यांनी शहराध्यक्ष अरविंद शिंदे ( Arvind Shinde ) यांना हटविण्यासाठी दिल्ली आणि राज्यातील वरिष्ठांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. दुसरीकडे रमेश बागवे यांना शह देण्यासाठी अरविंद शिंदे यांनी चार टर्म नगरसेवक राहिलेल्या ठाकरे गटातील अविनाश साळवे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला. रमेश बागवे इच्छुक असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून अविनाश साळे यांना उमेदवारीचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.

जातीय समीकरणांचा 'फॅक्टर' लक्षात घेऊनच साळवेंचा प्रवेश करून घेण्यात आला. येथून साळवे यांच्या माध्यमातून सहज विजय साकारता येईल, असा विश्वास काँग्रेसमधील नेत्यांना आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दहा इच्छुकांमध्ये तिकीटासाठी जोरदार संघर्ष होणार, हे मात्र निश्चित मानलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com