NCP Politics : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का! 'हा' माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, मुहूर्तही ठरला

Ramesh Thorat Joins Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परिणामी त्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Jul : दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत थोरात त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर थोरात यांचं अजितदादांसोबत जाणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा अजित पवारांच्या उपस्थितीत 1 ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी पार पडणार आहे. रमेश थोरातांची दौंड तालुक्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : वाल्मीक कराडला पाठिंबा देणाऱ्याला मंत्री करायला निघालात! अजितदादा ही विनाशकाले विपरीत बुद्धीच..

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परिणामी त्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली.

Sharad Pawar, Ajit Pawar
Bala Bangar On Walmik Karad : धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून वाल्मीकला आमदार अन् मंत्री व्हायचे होते! बाळा बांगरकडून मोठा दावा..

मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यातील अजितदादा गटाची ताकद वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com