Congress Leader End His Life : काँग्रेसच्या (Congress) एका जेष्ठ नेत्यांने विष पिऊन संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 2 मुलं आणि पत्नीसह या नेत्याने विष पिलं होतं. या घटनेत कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, या नेत्याने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. छत्तीसगडमधील जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक 10 येथे राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65) यांनी पत्नी व दोन मुलांसह विष पिलं.
या घटनेशी संबंधित अधिकची माहिती देताना एएसपी राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितलं की, 30 ऑगस्ट रोजी काँग्रेस (Congress) नेते पंचराम यादव यांनी पत्नी दिनेश नंदनी यादव (55), मुलंगा सूरज आणि नीरज यादव यांच्यासह विष प्राशन केलं.
या घटनेची माहिती समजताच त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र, चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आलं होतं. त्यानंतर सिम्स रुग्णालयात निरज यादवचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर तिघांना आरबी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, 31 ऑगस्ट रोजी या तिघांचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचराम यादव हे कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाखांचे कर्ज घेतले होते. शिवाय त्यांना हृदयाचा त्रास होता, तर त्यांची पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती. मुलगा नीरज खासगी नोकरी करत होता. तर सुरज कंत्राटदार म्हणून काम करायचा.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आत्महत्या केल्याचं कोणाला कळू नये म्हणून त्यांनी घराच्या समोरचा आणि मागचा दोन्ही दरवाजे आतून बंद केले होते. शेजारी राहणारी एक मुलगी त्यांच्या घरी गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दोन-तीन वेळा आवाज करूनही दरवाजा न उघडल्यामुळे घरात काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय आल्यामुळे तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजारचे लोक घरात गेले असता सर्वजण गंभीर अवस्थेत पडलेले दिलसे. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं पण अखेर या सर्वांचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.