BJP Vs Sharad Pawar NCP : मनोज जरांगेंच्या आरोपांवरून भाजपा अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जुंपली!

Ravikant Varpe News : फडणवीस महाराष्ट्राचे नारदमुनी असल्याचा रविकांत वरपेंचा आरोप, तर 'जरांगेंच्या बोलण्याला तुतारीचा आवाज' भाजपचं म्हणणं
Raviaknt Varpe
Raviaknt VarpeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Political News : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून मनोज जरांगेवर जोरदार टीका सुरू झाली. शिवाय, जरांगेच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज येत असल्याचं म्हणत भाजपा नेत्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप जरांगे यांनी फडणवीसांवर केला आहे. यानंतर रविवारी भाजपाचे प्रवीण दरेकर, नितेश राणे, प्रसाद लाड,आशिष शेलार हे हे मराठा आमदार जरांगेवर तुटून पडले होते. त्यांच्या आंदोलनामागे तुतारी असल्याचा आरोप लाड व राणेंनी केला. त्यावर आता शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'फडणीस(Devendra Fadnavis) हे राज्याचे कळीचे नारदमुनी आहेत.' असा हल्लाबोल त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raviaknt Varpe
Pune Loksabha Election 2024 : मोहोळ, मुळीक, मानकर...पुणे लोकसभेसाठी '3 M' इच्छुक!

जरांगेंनी(Manoj Jarange) फडणवीसांच्या मुंबईतील 'सागर' या निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय रविवारी घेतला होता. त्यावर आपला बंगला हा सरकारी असल्याने तेथे कोणीही येऊ शकते, असे फडणवीस म्हणाले होते. तर, त्याच बंगल्याचा वापर सध्या महाराष्ट्रधर्माचे नुकसान करण्यासाठी, राज्य अस्थिर करण्यासाठी, कपट छळासाठी, राजकीय घरं फोडण्यासाठी होत आहे. असा आरोप वरपेंनी केला. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाणारे आपले राज्य आणि त्याचा धर्म तोडण्याचे, जाती व धर्मात द्वेष निर्माण करण्याचे काम सागर बंगल्यावरून होत आहे,असे वरपे म्हणाले आहेत.

याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवस्थान हे एकेकाळी राज्यातील विकास, समृद्धी व प्रगतीचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. आज, मात्र त्याच वर्षा बंगल्याने सागर बंगल्यापुढे गुढघे टेकले आहेत. कारण सागर बंगला हा गुन्हेगार व गुंड लोकांचे आश्रयस्थान देणारे ठिकाण बनला आहे, असा आरोपही वरपेंनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Raviaknt Varpe
Shivsena News : जुन्नरसाठी शिवसेना आग्रही; शिवनेरीवर पुन्हा भगवा फडकविणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com