Ravindra Chavan : महापालिका निवडणूक महायुतीत की स्वबळावर? ; रवींद्र चव्हाणांनी सांगितली भाजपची सद्य भूमिका, म्हणाले..

Ravindra Chavan shares BJP’s current stand on municipal elections : राज्यात आता हळूहळू स्थानकि स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
Ravindra Chavan addressing the media on BJP’s position regarding contesting upcoming municipal elections independently or with the Mahayuti alliance.
Ravindra Chavan addressing the media on BJP’s position regarding contesting upcoming municipal elections independently or with the Mahayuti alliance. sarkarnama
Published on
Updated on

BJP’s Strategy for Upcoming Municipal Elections : राज्यात आता हळूहळू स्थानकि स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आता तयारी सुरू झाली आहे. बुथ लेव्हलपर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यात आता महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काय भूमिका घेतात, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढायची किंवा स्वबळावर याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाईल. त्यानुसार त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल. कार्यकर्त्यांना प्रभाग रचना, मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत." असे भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सांगितले आहे.

भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी बाणेर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यारव वेळी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे आदी उपस्थित होते.

Ravindra Chavan addressing the media on BJP’s position regarding contesting upcoming municipal elections independently or with the Mahayuti alliance.
NCP Pune leadership : महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!

फडणवीसांच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील -

या कार्यक्रमात बोलाताना रविंद्र चव्हाण म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत, या शहरामध्ये पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम केले आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत फडणवीस यांच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील, फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेते महायुती किंवा स्वबळावर निवडणूक लढायची याबाबत निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी प्रभाग रचनेवर लक्ष द्यावे."

Ravindra Chavan addressing the media on BJP’s position regarding contesting upcoming municipal elections independently or with the Mahayuti alliance.
Bihar Assembly Election : ‘APP’चा ‘I.N.D.I.A’आघाडीला झटका; बिहार विधानसभा स्वबळावरच लढवणार!

याशिवाय रविंद्र चव्हाण यांनी, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील ११ वर्षात अनेक महत्त्वाची कामे केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात चौथ्या स्थानावर आणले, लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर झेप घेईल.रस्ते, रेल्वेचे जाळे व्यापक केले, पायाभूत सोई सुविधा वाढविल्या.मोदी यांनी केलेला संकल्प सिद्धीस नेण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही यावेळी सांगितलं.

तसेच जागतिक योग दिन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण करणे अशा कार्यक्रमाद्वारे आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच काँग्रेसने आणलेल्या आणीबाणीचा दिवस २५ जून हा काळा दिवस आहे, त्यांनी संविधानाचा अपमान कसा केला, हेही लोकांना आम्ही सांगणार आहोत." असं यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com