Ravindra Chavan: विधान परिषद निवडणुकीसाठी रविंद्र चव्हाणांचा पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम! दगाफटका टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पक्षसंघटनेचा आढावा घेत मंडलस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत.
Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Ravindra Chavan BJP Maharashtra New AppointmentsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ravindra Chavan: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पक्षसंघटनेचा आढावा घेत मंडलस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी आणि निवडणुकीत होणारा दगाफटका टाळण्यासाठी भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी थेट संपर्क, बूथनिहाय नियोजन, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि प्रचाराची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होत आहे.

राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देऊन निवडणुकीच्या कामाला गती देण्याचे नियोजन भाजपने केले आहे. रवींद्र चव्हाण हे १२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत रोज एक दिवस एका जिल्ह्यासाठी देणार आहेत. सातारा, कोल्हापूर येथील बैठका पार पडल्या असून, उद्या (ता. १४) पुणे, त्यानंतर सांगली, सोलापूर या ठिकाणचा आढावा घेणार आहेत.

Ravindra Chavan BJP Maharashtra New Appointments
Krishna Khopde: बँकेत नोकरी लावून देतो म्हणून आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! नागपूरच्या भाजप आमदारानं सांगितला खळबळजनक प्रकार

त्याचप्रमाणे भाजपने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसह प्रभारीही नियुक्त केले आहेत. केवळ प्रचारावर अवलंबून न राहता संघटनेच्या प्रत्येक स्तरावर समन्वय साधून मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील बैठकांना निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे," असे प्रदेश सरचिटणीस, निवडणूक प्रमुख राजेश पांडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com