Ravindra Dhangekar: 'कसबा' गमावल्यानंंतर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी दिली 'ही' मोठी कबुली

Kasba Assembly Election 2024 : मुंबईमध्ये गुरुवारी (ता.28) काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या चिंतन बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांवरती चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ravindra Dhangekar News
Ravindra Dhangekar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पोटनिवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे भाजपनं विधानसभा निवडणुकीत कसब्यात आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. धंगेकरांचा पराभव हा एकमेव उद्देश भाजपसह महायुतीचा होता. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी पराभवातून धडा घेत मतदारसंंघात झोकून देऊन काम केलं. त्याचमुळे नुकत्याच कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत भाजपच्या रासने यांनी विजय मिळवला. या पराभवानंतर काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या या चुकीवरही बोट ठेवलं आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी (ता.28) काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या चिंतन बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांवरती चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. धंगेकर म्हणाले, निवडणूक निकालापूर्वी सर्व चॅनलसह इतर संस्थांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला नव्हता. त्यामुळे या सर्व निवडणुका हायजॅक करण्यात आल्या असण्याची दाट शक्यता आहे.

26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल असे सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कशाप्रकारे केंद्रीय संस्थांचा वापर करून निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो, हे समोर असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

Ravindra Dhangekar News
Ncp News : महाराष्ट्रातील विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद, एकनाथ शिंदें मंत्रिमंडळात?

सरकारी संस्था आणि योजनेच्या माध्यमातून शासनाचा पैसा निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न झाला. महायुतीचे सरकार गेलं तर लाडकी बहीण योजनेतून मिळणारा लाभ बंद होईल असे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, आम्ही लाडकी बहीण योजना कायम ठेवू हे सांगण्यात आम्ही कमी पडलो, अशी मोठी कबुलीही कसबा मतदारसंघ गमावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली.

निवडणुकीत जातीय समीकरणंही वापरली गेली. जातीय समिकरणं, विषारी प्रचार, आणि योजनांचा वापर असाच होत राहीला तर सामाजिक कार्यकर्त्याला निवडणूकीत उतरणं अवघड होणार आहे. गेल्या अडीच वर्षात शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करण्यात आला. आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा खिशात घेऊन निवडणुकीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विधानसभा निवडणुकी दरम्यान एकेएका मतदारसंघात 50 कोटी वाटले गेले, टेंडरमार्फत हा पैसा गोळा केला गेला. आणि त्या पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये करण्यात आल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

Ravindra Dhangekar News
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा 'तो' सल्ला महाविकास आघाडी मनावर घेणार का ?

विधानसभा निवडणुकी दरम्यान एकेएका मतदारसंघात 50 कोटी वाटले गेले, टेंडरमार्फत हा पैसा गोळा केला गेला. आणि त्या पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये करण्यात आल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. राज्यातील सरकारने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र वापरलं आहे. काल निवडणूका झाल्या आणि आज आम्ही परत सेफ झालो आहोत, मात्र, पुढच्या 5 वर्षांनी परत जातीय-धार्मिक राजकारण डोकं वर काढेल असं धंगेकर म्हणाले.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय खेचून आणला होता. त्यानंतर धंगेकर हे काँग्रेस पक्षाचा पुण्यासह राज्यातील प्रमुख चेहरा झाले होते.त्यातच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com