Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा 'तो' सल्ला महाविकास आघाडी मनावर घेणार का ?

Political News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंत्रीपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय एकत्रित बसून घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल असे स्पष्ट केले.
dhananjay munde
dhananjay mundeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालेआहे. हा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी मोठा धक्कादायक आहे. दुसरीकडे बहुमत मिळाले असल्याने लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठीच्या घडामोडीना वेग आला आहे. त्यातच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणुकीत जनतेने अभुतपूर्व यश महायुतीला दिले. आम्हाला दिलेले हे यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला. (Dhananjay Munde News)

ज्या-ज्या वेळेस वेळ मिळेल तेव्हा शिर्डीला येऊन साईंचा आशीर्वाद घेत असतो. निवडणुकीच्या आधी देखील साईबाबांचे दर्शन घेतलं होतं आणि आज निवडणूक झाल्यावर देखील मी साईंच दर्शन घ्यायला शिर्डीला आलो आहे. आपल्या मनातील श्रद्धेपोटी शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.

dhananjay munde
BJP Politics : मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा कायम असतानाच विनोद तावडेंना लागली लॉटरी, भाजपकडून 'या' महत्वाच्या पदी नियुक्ती

मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला येत आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साईदर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. कायम जनसेवेची सेवा करण्यासाठी सामर्थ्य, बळ, विवेकबुद्धी मिळो हेच साईबाबांकडे मागितले. देवेंद्र भाऊंची भेट ही कायम होत असते आणि रोज होते. गुरुवारी अराजकीय विषयांवर देवेंद्र भाऊंशी चर्चा करायची होती. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

dhananjay munde
Latur BJP News : लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा; निलंगेकर, पवार अन् कराडही रांगेत..

मंत्रीपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय एकत्रित बसून घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे. तुम्ही जेव्हा लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला कोणी जिंकवलं तर जनतेने. जेव्हा तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची हार ही ईव्हीएममुळे झाली. अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे. ईव्हीएमबाबत मतदान कसं झालं? उशिरा का झालं? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो.

dhananjay munde
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष मराठवाड्याच्या राजधानीतून गायब, याला जबाबदार कोण ?

जसा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला. मी तेव्हा ईव्हीएम वगैरे बोललो नाही. त्या पराभवानंतर पुन्हा जनसेवा केली आणि जनसेवेनंतर विधानसभेला जनतेने अभुतपूर्व यश महायुतीला दिले. जनतेने आम्हाला दिलेला यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.

dhananjay munde
Assembly Election: राजकीय पार्श्वभूमीचे 89 जण आमदार; 'घराणेशाही नको' म्हणणारा भाजपच विधानसभेत नंबर वन, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

काँग्रेसचे नेते जे म्हणतायत किंवा आरोप करताय त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी एकदा बघावे. ते कुठून कुठपर्यंत आले आहेत. त्यांनी जी काही आहे, तेव्हढी पण ठेवली नाही. जी लाज राहिली तेव्हढी तर राखावी. ते 2029 च सांगत आहेत. आज तुम्हाला महाराष्ट्रातील मायबाप जनतेने जो धडा शिकवला त्याबाबतीत बोला ना? असा सल्ला मुंडे यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना दिला.

dhananjay munde
Maharashtra Assembly Winter Session: महायुतीचे पहिले हिवाळी अधिवेशन किती आठवड्याचे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com