Kasba By Election Results 2023 : नवव्या फेरीअखेर भाजपचे रासने पिछाडीवरच, धंगेकरांकडे ४ हजार ५०६ मतांची आघाडी

Pune News : पहिल्या फेरीपासून धंगेकर आणि रासनेंमध्ये चुरशीची लढत....
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Ravindra Dhangekar Vs Hemant Rasane : कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ४५०६ मतांची आघाडी घेतली आहे. यात धंगेकर यांना ३४ हजार ७७८ मतं पडली आहेत. तर हेमंत रासने यांना ३० हजार २७२ मतं पडली आहेत.

आठव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ३५०० मतांची आघाडी घेतली आहे. आठव्या फेरीअखेर धंगेकर यांना ३० हजार ५२७ तर रासने यांना २७ हजार १८७ मतं पडली आहेत.

पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी चौथ्या फेरीत आघाडी घेतली होती. मात्र, पाचव्या आणि सहाव्या फेरीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जोरदार मुसंडी मारताना पुन्हा एकदा आघाडी घेतली होती.

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Pune By Election Results : पाचव्या, सहाव्या फेरीत धंगेकरांची जोरदार मुसंडी, तीन हजारांवर मतांची आघाडी

सहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना १९ हजार ६४५ तर हेमंत रासने यांना १६ हजार ४२३ मतं पडली आहेत. यात धंगेकर यांनी ३ हजार २२२ मतांनी आघाडी घेतली आहे. तर हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना १०० मतं तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना ४ मतं पडली आहे.

तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ११,७६१ मतं तर हेमंत रासने यांना १०,६७३ मतं पडली होती.

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२) मतमोजणी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य तिरंगी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने रिंगणात आहेत.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.

कसबा विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे.

ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 37 फेऱ्या

चिंचवड मतदारसंघाची (Chinchwad Bypoll Election) मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com