Pune Politics : पुण्यात 'रंग बरसे!' प्रचार थांबवून धंगेकर, मोहोळांसह 'या' नेत्यांची राजकीय धुलवड

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत दररोज एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी करणाऱ्या विविध पक्षांतील नेते धुलीवंदनाच्या निमित्ताने एकत्र आले होते.
Pune Dhulvad
Pune DhulvadSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरले उमेदवार आरोप प्रत्यारोप करत एकमेकांवर चिखलफेक करत आपला प्रचार करत असल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारचा दिवस मात्र याला अपवाद ठरला.

निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षाची मंडळी समोरासमोर आले. मात्र एकमेकांवर कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी न करता विविध रंगात ही मंडळी न्हाऊन गेली. निवडणुकीच्या प्रचाराला एक दिवस आराम देत सोमवारी सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धुळवडीचा आनंद लुटत एकमेकांवर विविध रंगांचा वर्षाव केला.

Pune Dhulvad
Shahaji Patil On Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून चालतील का? शहाजीबापूंनी एका वाक्यातच विषय संपवला

पुण्यात सामाजिक काम करणाऱ्या भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग बरसे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही राजकीय मंडळी एकत्र आली होती. रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान येथे डॉ. मिलिंद भोई यांच्या पुढाकारातून भोई प्रतिष्ठानच्या वतीने 'रंग बरसे' हा रंग महोत्सव घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Dhulvad
Lok Sabha Election 2024 News: 'या' राज्यात भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला दिले तिकीट

या कार्यक्रमात पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, (Ravindra Dhangekar) राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, भाजपाच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्यासह इतर राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे दररोज एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी करणाऱ्या विविध पक्षातील नेते आज धुलीवंदनाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा, अशी भावना व्यक्त केली.

आगामी निवडणूक आणि तुमच्या विरोधात उभे असलेले महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले, पुणेकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. आणि त्यांचा उमेदवार समोर आहे. आमच्या मागे वस्ताद आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार अन् जिंकणारही असा माझा विश्वास आहे. केंद्रात गेले दहा वर्ष असलेल्या भाजप सरकारला जनता आता कंटाळली आहे.

खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) म्हणाल्या, दरवर्षी सर्व राजकीय मतभेद विसरून या मुलांच्या उत्साहात आम्ही आनंदाने सहभागी होऊन खेळतो. एक दिवस राजकारणाला सुट्टी देऊन कोणतीही राजकीय चिखल न करता केवळ रंगांची उधळण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. माजी महापौर आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी देखील या उपक्रमाला हजेरी लावून उपस्थिततांबरोबर धूलवड साजरी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Dhulvad
Abhijit Bichukale News : सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकलेंनीही मारली उडी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com