Kasba By-Election Result : Ravindra Dhngekar
Kasba By-Election Result : Ravindra DhngekarSarkarnama

Ravindra Dhangekar Victory : धंगेकरांची क्रेज संपेना : भाऊंच्या विजयामुळे 'एक का डबल ऑफर..'

Kasba By-Election : कसब्याच्या चौकाचौकात विजयाचा जल्लोष..
Published on

Ravindra Dhangekar Victory : कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवाला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला. यानंतर धंगेकर यांची नावाची एकच चर्चा माध्यमात आणि समाज माध्यमात दिसून येत आहे. निकास जाहीर होऊन एक दिवस उलटून गेला, मात्र धंगेकर नावाची क्रेज कमी होताना दिसत नाही. आता धंगेकर यांचा विजय झाल्याबद्दल 'बाय वन गेट वन' ची ऑफर देण्यात आली आहे.

Kasba By-Election Result : Ravindra Dhngekar
Amol Mitkari News: आंबेडकरांचे अनुयायी गरीब असतील लाचार नाहीत!

धंगेकर यांच्या विजयाबद्दल पुण्यातील एका व्याव्यासायिकाने एक अनोखी ऑफर ठेवली आहे.रवींद्र धंगेकर विजयी झाल्याबद्दल एका रोलवर एक रोल फ्री, अशी ऑफर हॉटेल व्यावसायिकाकडून देण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातील सदाशिव पेठेतल्या एका हॉटेल व्याव्यासायिकाने एक रोलवर एक रोल फ्री अशी भन्नाट ऑफर ठेवली आहे. ही ऑफर दोन दिवस सुरू राहणार आहे.

Kasba By-Election Result : Ravindra Dhngekar
Rahul Gandhi News : केंब्रिजच्या व्यासपीठावर राहुल गांधींनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक ; म्हणाले..

जवळपास तीन दशकांच्या मोठ्या कालावधीनंतर कसब्यात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. जवळपास एकतीस वर्षांनी कसब्याला बिगरभाजप आमदार मिळाला आहे. कसब्यात चौकाचौकात महाविकास आघाडीचा विजयी जल्लोष सुरू आहे. रवींद्र धंगेकर यांचे होर्डिंग्स मतदारसंघात लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com