Laxman Hake : 'तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको'; लक्ष्मण हाके आलेल्या धमकीवर म्हणाले...

Laxman Hake Death Threat : पत्रकार परिषदेपूर्वी जीवे मारण्याची धमकीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, यावर लक्ष्मण हाके यांनी काय धमकी आली, यावर भाष्य केले.

'मला सातारा जिल्ह्यातून धमकीचा फोन आला आहे. तू तुझ्या घरचं बघं. या भानगडीत पडू नको. तुझ्या मागं कुत्रं नाही. माझ्या कोण आहे, हे समाज ठरवले. जीवे मारण्याच्या धमक्या या नित्याच्याच आहे. पण या धमक्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी', असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी त्यांना आलेल्या धमकीची माहिती दिली. धमकीचा फोन हा सातारा जिल्ह्यातून आल्याचे सांगितले. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी धमकीचा फोन आल्याचे असून, या धमक्या नित्याच्या आहेत. मी त्यात लक्ष घालत नाही, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

Laxman Hake
Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

'ओबीसी समाजासाठी लढतोय तेव्हापासून मला जातीवादी ठरवले गेले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे कुठेही समर्थन केलेले नाही. आरोपी, गुन्हेगारांचे (Crime) समर्थन केले नाही. परंतु एखाद्या जातीला क्रिमीनल ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध, असे म्हटल्यावर मला रोज जीव मारण्याचे काॅल येत आहेत. सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना, याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी', असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

Laxman Hake
BJP Politics : CM फडणवीसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात युद्ध छेडलं अन् किरीट सोमय्या 'अ‍ॅक्शन मोड'वर...

लातूरमधील युवकाच्या हत्येचा पाठपुरावा...

लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील मुलाच्या हत्याप्रकरणाकडे लक्ष वेधले. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा आरोप केला. माऊल सोट या युवकाची हत्या ऑनर किलिंग मधून झाली आहे. आम्ही आवाज उठवल्यानंतर या प्रकरणात सहा जणांना अटक झाली आहे. अजून काही आरोपी पसार आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

आमदार पवारांबरोबर आरोपीचे फोटो

'या प्रकरणातील आरोपीचे फोटो भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याबरोबर आहे. या आरोपीवर खुनाचे, अवैध सावकारीचे गुन्हे दाखल आहेत. कोणाचेही फोटो कोणाबरोबर असू शकतात. मी अभिमन्यू पवार यांच्या राजीनाम्यावर बोलणार नाही. परंतु, या पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या झाली, कोयत्या गँगची दहशत आहे, त्यावेळी लोकप्रतिनिधी कुठे जातात, असा प्रश्न करताना, ओबीसी समाजाविषयी लढत असताना, मला जातीवादी ठरवून धमक्या देत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी[, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com