

घोडगंगा कारखाना लवकर सुरू होणार – अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी १८५ कोटींच्या कर्ज प्रस्तावाला राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे सांगत निधी मिळताच ४० दिवसांत कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले.
सर्वपक्षीय सहकार्याची तयारी – कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटण्यास तयार असल्याचे ऋषीराज पवार यांनी स्पष्ट केले; शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीचा प्रस्ताव दिला आहे.
गाव विकासासाठी जमिनीची देणगी – न्हावरे गावाच्या विकासासाठी मागणीपेक्षा जास्त म्हणजे ११ एकर जागा देण्याचा ठराव कारखान्याने मंजूर केला आहे.
Pune, 29 September : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला होता. या कारखान्याच्या बंद अवस्थेवरूनच माजी आमदार अशोक पवार यांच्यावर सर्व बाजूंनी हल्ले झाले होते. मात्र, अशोक पवारांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी ‘घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटण्यास आम्ही तयार आहोत,’ असे सांगून काहींसी लवचिक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आता कारखाना कधी सुरू होणार, याकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची (Ghodganga Sugar Factory) 34 वी वार्षिक सभा शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील मंगल कार्यालयात अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. घोडगंगा कारखान्याची सभा म्हटलं की गोंधळ, हमरीतुमरी, वाद ठरलेला. मात्र, यावेळी तुलनेने तरुण व नवखे असलेल्या ऋषीराज पवारांच्या संयमीपणामुळे कोणत्याही वादाशिवाय सभा झाली.
माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांशी लवचिक भूमिका घेऊन कारखाना सुरू करावा, अशी मागणी महेश ढमढेरे यांनी केली. शशिकांत दसगुडे यांनी ‘घोडगंगाच्या सभासदांना राजकीय भाषणे ऐकायची नाहीत, कारखाना केव्हा सुरू होणार याचे उत्तर त्यांना हवे आहे, अशी मागणी केली. दरम्यान, कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी ‘राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,’ असा मुद्दा मांडला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखाना सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी भेट घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. घोडगंगाच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे 185 कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याचा प्रस्ताव दिला आहे, असे ऋषीराज पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, घोडगंगाच्या या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत. कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच पुढील 25 दिवसांत निधी उपलब्ध होईल. निधी मिळाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील 40 दिवसांत कारखाना सुरु करण्यात येईल.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचा आमचा ठाम मानस आहे, त्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटण्यास आम्ही तयार आहोत. कारखान्याला कर्ज मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सकारात्मक असून लवकरच निधी उपलब्ध होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
न्हावरे गावाला 10 नव्हे 11 एकर जागा मिळणार
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडे 113 एकर जागा आहे. त्यापैकी दहा एकर जागा न्हावरे गावच्या विकास कामांसाठी देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्याचा उल्लेख करून कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी ‘आम्ही कायम गावच्या विकासासाठी तत्पर असून दहाच काय अकरा एकर जागा देण्याचा ठराव आम्ही मंजूर केला आहे, असे जाहीर केले.
प्र: घोडगंगा साखर कारखाना कधी सुरू होणार आहे?
उ: कर्ज मंजूर होऊन निधी मिळताच पुढील ४० दिवसांत कारखाना सुरू केला जाईल.
प्र: कर्जासाठी किती रकमेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे?
उ: १८५ कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे.
प्र: कारखाना सुरू करण्यासाठी कोणती राजकीय भूमिका घेतली आहे?
उ: कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटून सहकार्य मिळवण्याची लवचिक भूमिका ऋषीराज पवार यांनी घेतली आहे.
प्र: न्हावरे गावाला किती जागा देण्याचा ठराव झाला आहे?
उ: गावाच्या विकासासाठी ११ एकर जागा देण्याचा ठराव कारखान्याने मंजूर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.