School Closed : पावसाचा जोर कायम, प्रशासनाकडून 'रेड अलर्ट', 'या' जिल्ह्यातील शाळा बंद, पुणे शहरासाठी काय निर्णय?

Maharashtra Rain Alert School Closed : मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस देखील धुव्वाधार पाऊस सुरूच राहणार आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
rain .jpg
rain .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Heavy Rain : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र तुफान पाऊस सुरू आहे. आज आणि उद्या देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाकडून काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून सातार जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा या सहा तालुक्यांतील शाळांना आज बुधवार (ता.20) आणि उद्या गुरुवार (ता.21) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघरमध्ये देखील पावसाचा जोर कायम असून पालघरसह ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, सांगली, लोणावळा परिसरातील देखील शाळांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे शहरात शाळा सुरू

पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा सह पुणे घाटमाथा येथे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे घाटमाथ्यावर धुव्वाधार पाऊस सुरू असताना पुणे शहरात देखील पावसाचा जोर चांगला आहे. पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून शहरामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज पुणे शहरातील शाळा सुरूच राहणार आहेत.

rain .jpg
Gopichand Padalkar : वादग्रस्त गोपीचंद पडळकरांना आता भाजपही वैतागला? CM फडणवीसांनी पर्याय शोधलाय...

ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद

ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली , उल्हासनगर आणि अंबरनाथमधील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गमधील शाळांना सुट्टी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक सरकारी आणि खासगी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

rain .jpg
Pune Lonavala Local : CM फडणवीसांचा मोठा निर्णय! खासदार मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणेकरांना मिळाली 'लोकल'ची गिफ्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com