Konkan News : वैभव नाईकांनी नऊ वर्षांत जे केले, ते तुमच्या नेत्यांना २५ वर्षांत जमलं नाही; ठाकरे गटाने राणे समर्थकांस सुनावले

त्यावेळी त्यांचा मृतदेह पैसे भरल्याशिवाय देत नव्हते, हे तुम्हाला ठाऊक आहे.
Vaibhav Naik- Narayan Rane
Vaibhav Naik- Narayan Rane sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी गेल्या नऊ वर्षांत केले ते तुमच्या नेत्यांना मागील २५ वर्षांत जमले नाही, अशी टीका भाजपच्या उद्योग व्यापारी आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा राणे समर्थक विजय केनवडेकर यांच्यावर ठाकरे गटाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली आहे. (BJP workers also get compensation for Taouktae storm: shiv sena Leader)

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या जनतेचे पंचनामे करून घेण्यात आमचे (शिवसेनेचे ) पदाधिकारी, कार्यकर्ते दबाव आणत होते, असे जर तुमचे म्हणणे असेल तर आम्ही किती निधी आणून दाखविला, हे तुम्ही पाहिले आहे. ही भरपाई केवळ शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना नाही, तर सर्वसामान्य नुकसानग्रस्तांना मिळाली आहे. यात तुमच्या पक्षाच्या भाजप (BJP) ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही लाभ घेतला आहे, याची माहिती घ्यावी, असा सल्लाही जोगी यांनी केनवडेकरांना दिला.

Vaibhav Naik- Narayan Rane
Madha Loksabha News : भाजप खासदार निंबाळकरांनी आमच्या मदतीची जाणीव ठेवली नाही; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाने डागली तोफ

जोगी म्हणाले की, तौक्ते वादळात जेवढी नुकसान भरपाई मिळाली, तेवढी मदत यापूर्वी कधीही मिळाली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा शिवसेनेमुळे आणि आमदार नाईक यांच्यामुळेच मिळाला, हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याबद्दल भाजपचे केनवडेकर यांचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जोगी यांनी आभार मानले आहेत. आमदार नाईक मालवणची वादळानंतरची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत मालवणमध्ये आठ दिवस ठाण मांडून होते, हे सुद्धा जनतेने पाहिले आहे तसेच तुमचे नेते त्यावेळी कुठे होते? हे सुद्धा जनतेला माहीत आहे.

Vaibhav Naik- Narayan Rane
Maratha Mandir Sanstha : पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे?, बरोबर ना चंद्रकांतदादा? ; मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने संभ्रम वाढला

केनवडेकर तुम्ही आमच्या खासदार, आमदार यांची चिंता अजिबात करू नका. कोण कोणाच्या पायाखालची वाळू सरकवतो, हे येणाऱ्या निवडणुकीत जनताच दाखवून देईल. त्यामुळे तुम्ही ज्या वाळू विषयात लक्ष घालता, तोच वाळू विषय सांभाळावा. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नादी लागू नका, ते तुम्हाला पुरून उरतील, अशी टीकाही जोगी यांनी केली आहे.

Vaibhav Naik- Narayan Rane
KCR Tour In Solapur : केसीआर अन॒ त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ उद्या सोलापूर मुक्कामी; तीन हॉटेल बुक, नव्या घोषणेची शक्यता

कोविड काळात तुमच्या नेत्यांच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांवर मोफत उपचार झाले व कोणत्या कार्यकर्त्याचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा मृतदेह पैसे भरल्याशिवाय देत नव्हते, हे तुम्हाला ठाऊक आहे. संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे कोविड काळात कोणी कोणाला सहकार्य केले, हे जनतेला माहित आहे ,असेही जोगी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com