Pimpri Chinchwad Crime News : 'मुळशी पॅटर्न'ची पुनरावृत्ती टळली, पुणे ग्रामीण पोलिसांची ऐन गणेशोत्सवात मोठी कारवाई

Pune Gramin Police : हिंजवडी आयटी पार्क आणि नंतर आलेल्या 'मुळशी पॅटर्न' मुळे मुळशी तालुका चर्चेत आला.
Pimpri Chinchwad Crime News
Pimpri Chinchwad Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : सणासुदीची संधी साधून समाजकंटक आपल्या कारवाया करत असतात. त्यांचा हा डाव पुणे ग्रामीण पोलिसांच्या `एलसीबी`ने (स्थानिक गुन्हे शाखा) सोमवारी उधळला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात येऊ घातलेले विघ्न टाळल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी केला. त्यांनी मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा काल जप्त केला.

हिंजवडी आयटी पार्क आणि नंतर आलेल्या 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern)मुळे मुळशी तालुका चर्चेत आला. तेथे परराज्यातून व त्यातही मध्यप्रदेशातून पिस्तूलांची स्मगलिंग होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सोमवारी पकडलेला हा शस्त्रसाठा सुद्धा बाहेरील राज्यातूनच आल्याचे समजते. मात्र, तो देणारा न सापडल्याने या शक्यतेला लगेच दुजोरा मिळू शकला नाही.

Pimpri Chinchwad Crime News
Supreme Court On Shivsena : ठाकरे गटासह शिंदे गटाची धडधड वाढली, १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीची तारीख ठरली

पुणे एलसीबी आणि स्थानिक पौड पोलीस ठाणे या तिसऱ्या फरारी आरोपीचा कसून शोध आहे,असे ही कारवाई केलेले पुणे `एलसीबी`चे पीआय अविनाश शिळीमकर यांनी `सरकारनामा`ला सांगितले. या अवैध शस्त्र साठ्याप्रकरणी अटक केलेल्या जोडगोळीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

अवैध शस्त्र साठ्याप्रकरणी सागर मल्लेश व्हंदमुळे (वय २५,वातुंडे) आणि निलेश अशोक चौगुले (वय २६,रा.सूसगाव) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चौगुले हा हॉटेलमालक,तर व्हंदमुळे हा त्याचा कामगार आहे. हा शस्त्रसाठा घेऊन वातुंडे बस स्टॉपजवळ येणार असल्याची खबर एलसीबीतील पोलीस नाईक तुषार भोईटे यांना काल मिळाली.

त्यानुसार सापळा लावून एलसीबीचे पीआय शिळीमकर,एपीआय नेताजी गांधारे पथकाने ही कारवाई केली.त्यावेळी त्यांच्याकडे दोन लाख १४ हजाराचा हा शस्त्रसाठा सापडला.ही कारवाई केल्याबद्दल वातुंडे ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले. याबाबत पौड पोलिस ठाण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीआय मनोज यादव पुढील तपास करत आहेत.(Crime News)

चौगुले हा स्थानिक असून शेतीवाडी असल्याने गुंठामंत्र्यांच्या थाटात राहत होता. सामाजिक कार्यकर्ता तथा नेता म्हणून तो मिरवत होता.भोवती तरुणांचा घोळका ठेवत होता. त्यातून दहीहंडी उत्सवात आणि फ्लेक्स लावण्यावरून प्रतिस्पर्ध्यांकडून त्याला धमकी आली. त्यातून बचाव करण्यासाठी त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध शस्त्रसाठा मागवला होता. त्यातील काही तो आपल्या पोरांनाही देणार होता,असे पोलीस(Police) सूत्रांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Pimpri Chinchwad Crime News
Jayant Patil On Election Commission: पक्षात फूट पडली नसल्याचे सांगूनही सुनावणीसाठी बोलावलं; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com