PM Modi in Pune : '...त्यामुळे रोड शो दरम्यान काळजी घ्यावी' ; शरद पवारांच्या 'या' आमदाराचा पुण्यात येणाऱ्या मोदींना सल्ला!

NCP Sharad Pawar party Advice To PM Modi : जाणून घ्या, नेमकं कोणत्या आमदाराने हे म्हटलं आहे? ; '...या बारचे फोटो सोबत पाठवत आहे, महत्वाचं वाटल्यास कारवाई करायचे आदेश द्याल, ही अपेक्षा.' असंही म्हटलेलं आहे.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar Advice to PM Modi regarding pune Rally : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज(मंगळवार) पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभास्थळी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान रोड शो देखील करण्याची शक्यता आहे. मोदींचा वाहन ताफा एफसी रोड मार्गे एस पी कॉलेज येथील सभास्थळी पोहचणार आहे. दरम्यान 'या पुण्यातील रस्त्यांनी येताना मोदी साहेब तुम्ही काळजी घ्या.' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा धुमधडाका सध्या महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रातील दिग्गज नेते महाराष्ट्राच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) देखील राज्यातील विविध ठिकाणी सभा घेताना पाहायला मिळत आहेत. आज देखील पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांची चिमूर आणि सोलापूर येथे सभा संपन्न झाली आहे. त्यानंतर आता त्यांची पुण्यात सभा होणार आहे.

या सभेसाठी भाजपकडून(BJP) जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी आज प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारी या सभेला आपली उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. तसेच या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला नसतील.

Sharad Pawar, Narendra Modi
Chinchwad Assembly Constituency: ...म्हणून चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतोय चक्क उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नेता!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभेला येण्यापूर्वी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले आहेत की, 'आदरणीय मोदी साहेब, ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुण्याचे रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनले असून या रस्त्यांवर टँकर क्षणार्धात रस्त्याखाली जातो. त्यामुळे रोड शो दरम्यान काळजी घ्यावी. अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचे नव्याने उदयाला आलेल्या ‘बार संस्कृती’मुळे बारा वाजलेत आणि हेच पुणे शहर अंमली पदार्थांचं प्रमुख केंद्र बनलंय. इथंल्या कोयता गँगची तर पोलिसांवरही हल्ला करण्यापर्यंत मजल गेलीय.'

याशिवाय पुढे रोहित पवार म्हणतात 'आपण ज्या एफसी रोडवरून जाणार त्याच रस्त्यावर दोन-तीन महिन्यांपूर्वी अंमली पदार्थांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेंव्हा सरकारने स्वतःची इमेज जपण्यासाठी अतिक्रमणात असलेल्या ज्या बारवर कारवाई केली, आज त्याच बारवाल्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून आधीपेक्षा मजबूत अतिक्रमण केलं. एवढं होऊनही राज्याच्या अकार्यक्षम गृहमंत्र्यांचं मात्र लक्ष नाही. या बारचे फोटो सोबत पाठवत आहे, महत्वाचं वाटल्यास कारवाई करायचे आदेश द्याल, ही अपेक्षा.' असंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com