Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. यावर पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
पुणे (PUNE) दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर रोहित पवार म्हणाले, ओबीसी अथवा मराठी समाजाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील. मात्र सामान्य जनता योग्य व्यक्तीला निवडून देऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी सत्ता लागते ती महाविकास आघाडीची सत्ता आणतील, असा विश्वास व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक करत अजित पवार स्पष्ट वक्ते असून त्यांनी कधीही जातीचा राजकारण केलं नाही, असं विधान केलं होतं त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी बोलून दाखवावं. सध्या सुरू असलेल्या सामाजिक तेढ हा भाजपच्या लोकांनी तयार केला आहे. राज ठाकरे हे जर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणारी वक्तव्य करत असतील, तर त्यांनी सांगावं की भाजपने दोन समाजामध्ये ते निर्माण केला की नाही? भाजप नेते गुजरातची गुलामगिरी करत नाहीत का?" असा सवाल राज ठाकरेंना रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले, "2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवरून भाजप सरकार विरोधात मोर्चा खोलला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाच्या बाजूने बोलत होते. पाच वर्षांमध्ये, असं काही बदललं आहे का? की राज ठाकरे आता भाजपची बाजू घ्यायला लागले आहे". त्यामुळे कोण कोणाची बाजू घेताय हे जनतेला समजत असून आगामी निवडणुकीमध्ये जनता त्यांना खड्यासारखं बाजूला काढतील, अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली.
"तुम्ही कचाकच बटन दाबा तुम्हाला हवं ते जेवण आम्ही घरी देऊ, असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यावर रोहित पवार म्हणाले, त्यांच्याकडे पैसे आहे, त्यामुळे ते, असं वक्तव्य करत आहेत. यापूर्वी देखील मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरू, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. लोकांचा असलेला पैस परत त्यांनाच काही थोड्या प्रमाणात द्यायचा आणि निवडून आल्यानंतर पुन्हा ओरबडायचा, अशी भूमिका सध्या सत्तेत असलेल्या लोकांची दिसते", असे रोहित पवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.