Rohit Pawar: मोठा ट्विस्ट! जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले,'अद्याप प्रदेशाध्यक्ष ठरलेला नसून...'

NCP Jayant Patil Resign : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पुढील प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे असतील अशा जोरदार चर्चा सुरू आहेत.
Rohit Pawar, Jayant Patil
Rohit Pawar, Jayant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पुढील प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे असतील अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अद्याप प्रदेशाध्यक्ष ठरलेला नसून चार नावं चर्चेत आहे. त्यातील एक नाव निश्चित करण्यात येणार असल्याचं सांगितले आहे. तसेच मला देखील पद मिळणार असून त्याला योग्य न्याय देण्याचं काम आपण करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.

पुण्यामध्ये रोहित पवार (Rohit Pawar) यांची शनिवारी (ता.12) पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदावर मी भूमिका मांडली होती. त्यावेळी मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. मात्र, कोणत्याही एखाद्या संधी द्या, जयंत पाटील यांचं त्यांना मार्गदर्शन राहील अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार वरिष्ठ मंडळींनी बदल करण्याचा निर्णय घेऊन हा निर्णय घेतला असेल, असं रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं होतं. त्यानुसार हे घडत आहे. मात्र राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील हे बीजेपीमध्ये जातील हे म्हणणं चुकीचं आहे. ते घाबरणारे नेते नाहीत ते सत्तेसाठी विचार सोडून कुठेही जाणार नाही. सत्तेत गेल्यानंतर मंत्रिपद मिळेल म्हणून ते पळणारे नेते नाहीत असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या ज्या नावाची चर्चा सुरू आहे. ती फक्त लोकांमध्ये आहे. पंधरा तारखेला शरद पवारसाहेब नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करतील. सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चार नावं चर्चेत असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar, Jayant Patil
NCP Politics: शर्यतीतील दिग्गज नेत्यांचा पत्ता कट? नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; 'या' आहेत जमेच्या बाजू

पक्षाची भूमिका मी सातत्याने मांडत आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पद हे मी कधीही टार्गेट ठेवलेलं नाही. पण छोटेसे एखादे पद मला पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल. पंधरा तारखेला पक्षाची बैठक होऊल आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून कुणाला कोणतं पद द्यायचं याबाबत निर्णय होईल.

रोहित पवार म्हणाले, आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी काही नाव सुचवली होती. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. पंधरा तारखेला प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांची नावे देखील टप्प्याटप्पाने जाहीर करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.