Rohit Pawar : रोहित पवारांनी मीडियासमोर खेकडा दाखवत अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याचे सायरन पुन्हा वाजवले

Rohit Pawar on Ambulance Scam : राज्यातील आरोग्य विभागात सहा हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी करत दुसरी फाइल उघडून अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन पुन्हा एकदा वाजवला आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत राज्यातील भ्रष्टाचाराचा मोठा गौप्यस्फोट केला. राज्यातील आरोग्य विभागात सहा हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी करत दुसरी फाइल उघडून अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन पुन्हा एकदा वाजवला आहे.

राज्यातील तब्बल सहा हजार कोटींचा 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा' 'सरकारनामा'ने उघडकीस आणला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला या घोटाळ्यावरून घेरले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या टेंडरमध्ये काही बदल करून, राज्य सरकारने एकप्रकारे हा घोटाळा कबूलच केला आहे. त्यानंतर आता ठाकरेंनीही या घोटाळ्यावरून शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवार यांनी या घोटाळ्यातील दुसरी फाइल ओपन करून या घोटाळ्याच्या सायरन पुन्हा एकदा वाजवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे (Pune) येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार म्हणाले, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

पवार म्हणाले, "निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून, नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाइन करून वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडेसहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून, राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणीही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.

Rohit Pawar
Arvind Kejriwal News : केजरीवालांनी आपल्याच दोन मंत्र्यांना आणलं अडचणीत? ‘ईडी’चा कोर्टात मोठा दावा

"स्वच्छता काम टेंडर अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपन्यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्या सोबत करार करण्यात आला. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाइन केले आणि त्यांनाच मिळाले. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना ही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हीजी कंपनीलाही नाराज न करता त्यांनादेखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchawad) अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे." सावंत यांना मी पाच दिवसांचा वेळ देतो, त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून, पारदर्शक प्रक्रिया राबवावी, असा टोला त्यांनी लगावला.

खेकडा आरोग्य विभागाला पोखरतोय

तानाजी सावंत (Tanaji Savant) यांनी " खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळती लागते" असे विधान केले होते, या विधानाचा आधार घेत पवार म्हणाले, " सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जाऊन बसतो. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय."

Edited By : Rashmi Mane

R

Rohit Pawar
Latur Lok Sabha Election: वंचितच्या उमेदवारीने लातुरात आघाडीचं टेन्शन वाढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com