Rohit Pawar News : '..तर माझं काय चुकलं? ; हे तुम्हाला शोभत नाही' ; रोहित पवारांचा छगन भुजबळांवर पलटवार!

Rohit Pawar to Chhagan Bhujbal : '...हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे.' असं म्हणत रोहित पवारांनी भुजबळांना आव्हानही दिलं आहे.
Rohit Pawar to Chhagan Bhujbal
Rohit Pawar to Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawars reply to Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. 'अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्या ठिकाणी दगडफेक झाली, लाठीमार झाला. त्यावेळी जरांगे निघून गेले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी यांनी त्याला तेथे आणून बसवला.' असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले, 'आदरणीय भुजबळ साहेब, सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने, त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?'

Rohit Pawar to Chhagan Bhujbal
Bhujbal Vs Rohit Pawar : रोहित पवार आईच्या पोटात होते, त्यावेळी मी आमदार अन्‌ महापौर होतो; छगन भुजबळ यांचा टोला

तसेच 'ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे(Rajesh Tope) साहेबांवर ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे.' असंही रोहित पवारांनी म्हटलं

पुढे बोलताना रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, 'असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या. तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती.'

Rohit Pawar to Chhagan Bhujbal
Rohit Pawar : 'हा तर निचपणाचा कळस,' रोहित पवार शिंदे सरकारवर भडकले; अधिवेशन बोलवण्याची केली मागणी

भुजबळ म्हणाले होते 'ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी मनोज जरांगे निघून गेला होता. पण शरद पवार गटातील दोन आमदारांनी त्याला परत आणून बसवलं, पवारसाहेबांना त्यांनी तिकडे नेलं, उद्धव ठाकरे यांना तेथे नेलं. या दोघांना याची कल्पना नव्हती पोलिसांवर दगडफेक झाली आहे. 80 पोलिस जखमी झाले आहेत. त्यामध्ये महिला पोलिस देखील होत्या. ते रुग्णालयात दाखल झाले होते. स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला केला.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com