RPI Leader Murder Case: धक्कादायक! आरपीआय नेत्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, नेमका थरार कसा घडला?

RPI leader brutally murdered with sharp weapon: महाराष्ट्रात आरपीआय नेत्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
shocking murder case of RPI leader
shocking murder case of RPI leaderSarkarnama
Published on
Updated on

how RPI leader murder incident happened: पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांच्यावर काल अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. मोशी परिसरात असलेल्या युवराज रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी काल नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

अनिल मोरे हे काही सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये उपस्थित होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सलग वार करत त्यांना गंभीर जखमी केले. हा हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

shocking murder case of RPI leader
Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवारांनी सुत्रं फिरवली, एका निर्णयाने जय-पार्थ पवारांना ताकद, पक्षाच्या आर्थिक व्यवहार…

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विविध तपास पथके तयार करण्यात आली असून संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अनिल मोरे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आरपीआय कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. काही कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही दिला आहे.

shocking murder case of RPI leader
Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवारांनी सुत्रं फिरवली, एका निर्णयाने जय-पार्थ पवारांना ताकद, पक्षाच्या आर्थिक व्यवहार…

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com