पुणे : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (Chairperson of the State Women's Commission) नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना राज्य सरकारकडून ख्रिसमसचं गिफ्टही मिळालं आहे. राज्य सरकारकडून रुपाली चाकणकर यांना 'राज्यमंत्री' (Minister of State ') पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
पुढील तीन वर्षांसाठी त्यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद राहणार आहे. रुपाली चाकणकरांना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हाच त्यांना राज्यमंत्री पद देण्याबाबतही चर्चा सुरु होती. त्यानंतर अखेर शुक्रवारी त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. रहाटकर यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर गेल्या वर्षभरापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यानंतर या पदावर चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यपद स्विकारल्यापासून राज्यातील महिला सुरक्षेसंदर्भात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या व्यक्तव्याची गंभीर दखल त्यांनी घेतली होती. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही त्यांनी फटकारले होत. त्यामुळे चाकणकर यांनी आयोगाच्या माध्यमातून महिलांवरील आत्याचारा विरोधात धडक काम सुरु केले आहे.
चाकणकर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यामुळे महिलांच्या बाबतचे प्रश्न सोडवण्यास त्यांना मदत मिळणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेचे शक्ती विधेयक शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यानंतर चाकणकर यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महिला सुरक्षेबातत कडक धोरण अवलंबले असल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.