Rupali Chakankar On Supriya Sule : 'लाडकी बहीण' योजनेवरुन चाकणकरांनी साधला खासदार सुळेंवर निशाणा

NCP Ajit Pawar Political News : महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील भगिनींना आर्थिक पाठबळ दिलं. त्यानंतर ही योजना सुरू झाली आणि ती यशस्वी होताना दिसली तेव्हापासून खासदार सुप्रिया सुळेंसह विरोधकांची पोटदुखी सुरू झाली.
Rupali Chakankar, Supriya Sule
Rupali Chakankar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. चाकणकर यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी केली आहे.

सोशल मीडियावरती ट्विट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून रूपाली चाकणकर म्हणाल्या, महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील भगिनींना आर्थिक पाठबळ दिलं. त्यानंतर ही योजना सुरू झाली. ती यशस्वी होताना दिसली, तेव्हापासून खासदार सुप्रिया सुळेंसह विरोधकांची पोटदुखी सुरू झाली.

त्या दिवसापासून त्यांनी या योजनेला विरोध केला, खरंतर महिला म्हणून त्यांनी या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वागत करणं आवश्यक होतं. मात्र, त्यांनी ही फसवी योजना आहे, ही योजना म्हणजेच चुनावी जुमला आहे पैसे खात्यात आले असतील तर काढून घ्या. नाहीतर सरकार पैसे परत काढून घेईल अशा प्रकारची नकारात्मक विधान त्यांनी केली.

याचा कळस म्हणून त्यांनी 1500 मध्ये महिलांना विकत घेता येत नाही आणि 2 कोटी 40 लाख महिलांना दीड हजार रुपये दिले तर राज्य कर्जबाजारी होईल असं सांगितले. परंतु काल महाविकास आघाडीने जी पंचसूत्री सादर केली. त्यामध्ये पहिलीच घोषणाही लाडक्या बहिणीबाबत होती. त्यामध्ये त्यांनी या योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Rupali Chakankar, Supriya Sule
Sopal Vs Raut : बार्शीत सोपल-राऊत वादाचा उडाला भडका; हुल्लडबाजी...आक्षेपार्ह हावभाव अन्‌ इशारे!

त्यामुळे या निमित्ताने मला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रश्न विचारायचा आहे. दीड हजारमध्ये जर राज्य कर्जबाजारी होत असेल, तर तुम्ही 3000 चे नियोजन कसं केलं आहे?. दीड हजारमध्ये महिलांना विकत घेता येत नाही, तर तुम्ही 3000 मध्ये कसं विकत घेणार? हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे. असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून जे काही अजित पवार आणि महायुती सरकार वर आरोप करण्यात आले ते फक्त राजकीय होते हे समजतं.त्यामुळे तुम्ही समस्त महिला भगिनींची माफी मागणं आवश्यक आहे. तसेच महिला बहिणींचा सुप्रिया सुळे यांनी अपमान केल्याने तुतारीच्या उमेदवाराला मतदान न करून त्याचा बदला घ्यावा, असं आवाहन रूपाली चाकणकर यांनी महिलांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com