Pune Political News : कल्याणीनगर अपघातप्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या अपघाताने राज्याचे राजकारण तापले आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे पोलिसांना धारेवर धरले. तसेच त्यांनी महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हातपाय बांधले आहेत, अशी टीकाही केली. यावर धंगेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. Ravindra Dhangekar News
रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar पुण्यातील अपघातप्रकरणी शनिवारी (ता. २५) अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवार हे आमचे नेते आहेत. ते कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील. आता मात्र शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांना किती सहभागी करून घेतले जाते? त्यांचे किती ऐकले जाते? हा महत्त्वाचा भाग आहे. गंभीर प्रकरणांमध्ये अजित पवारांना कोणता रोल द्यायचा, हे सध्या निश्चित झालेले नाही. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ असतात. त्यांचे हातपाय बांधून त्यांना पळायला लावले आहे. ते पळू शकत नसून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनीच निर्णय घेतले. पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी कुठल्याही अधिकाऱ्याला तंबी दिली नाही. दादांची जी भाषा असते ती दिसत नाही. त्यामुळे अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी हातपाय बांधून खुर्ची वरती बसवलेले आहे, अशी टीका धंगेकरांनी केली होती.
धंगेकरांच्या या आरोपांना रूपाली पाटील ठोंबरेंनी Rupali thombre Patil सडेतोच उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आमदार रवीभाऊ धंगेकर, फडवणीस साहेबांनी अजितदादांचे हातपाय बांधले, असे तुम्ही बोलून गेलात, पण तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. हे तेच अजितदादा आहेत, जे महविकास आघाडीमध्ये असताना तुमच्या आमदारकीचा हातपाय झटकून, तन-मन-धनाने काम केले. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले होते. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे.
पुण्यात ज्या अल्पवयीन मलाकडून नशापणी करत अपघात घडला, त्यात दुर्देवी दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला. भयाण आणि धक्कादायक घटनेने पुणे हादरले. त्यात खुद्द त्या खात्याच्या प्रमुखाने, गृहमंत्री यांनी पोलिस आयुक्तालयात येवून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांना निलंबन केले. महायुतीचे सरकार असल्याने अजितदादा Ajit Pawar आणि फडवणीससाहेब यांच्यातील समन्वय, संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याचा जास्त वेदना होत आहे, याची जाणीव आहे आम्हाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गृहमंत्री यांनी कारवाई आदेश दिले म्हणजे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून एकत्रित निर्णय केला असा असतो. तो भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात. जरा आपले पुणे आपली युवा पिढी, चांगले लोकप्रतिनिधी बनून पुणे वाचवू या आणि घडवू या. नुसते राजकीय स्टंट नकोत. त्यामुळे कामाची दिशा भरकट जाते, अशी टीका ठोंबरे पाटील यांनी केली यांनी केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.