Sadabhau Khot Slam Sanjay Raut : राऊत म्हणजे दादा कोंडके पार्ट टू ; सदाभाऊ खोतांनी उठवली खिल्ली

Sadabhau Khot News : संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोतांनी जोरदार हल्लाबोल केला.
Sanjay Raut, Sadabhau Khot
Sanjay Raut, Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Pune : रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे नुकताच झाला. यावेळी शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी येत्या 1 तारखेला कारखान्यासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी यावेळी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला दिला. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या साखर कारखान्यांपुढे आंदोलन करण्याचाही इशारा खोत यांनी दिला.

सदाभाऊ खोत म्हणाले, "शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, तर महागाई निश्चितपणे कमी होईल. कारण, महागाईची ज्यांना सर्वाधिक झळ पोहोचते, ती माणसेच शेतीत काम करतात. त्यानंतर शेतकरी त्यांना 2 पैसे देतात. गाईच्या दुधाला प्रति लीटर 75 भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला 125 रूपये प्रति लीटर दर मिळाला पाहिजे. ही दरवाढ देणे कठीण नाही. यामुळे महागाईही वाढत नाही," "देशी दारूच्या एका बाटलीएवढे आम्हाला पैसे नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात, तेवढा दर आम्हाला 1 लीटर दुधाला द्या," असे खोत म्हणाले.

Sanjay Raut, Sadabhau Khot
Dhule Lok Sabha constituency : भाजपच्या खासदाराला माजी पोलीस अधिकाऱ्याचे आव्हान ; निवडणूक लढविणारच..

"काही साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे दिले नाही. या कारखान्यांनी 30 जूनपर्यंत पैसे दिले नाही, तर आम्ही 1 जुलै रोजी सदर कारखान्यांपुढे धरणे आंदोलन करू," असे खोत म्हणाले. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोतांनी जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut, Sadabhau Khot
Manipur Violence : मणिपूर पेटलंय..काय आहेत मागण्या ? हिंसाचार कशासाठी ? मोदींनी व्यक्त व्हायला हवे..; सविस्तर वाचा

"जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते," असे मत खासदार संजय राऊत यांनी रविवारी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने शिबिराचे आयोजन केले आहे. वरळीत आयोजीत शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राऊतांच्या या विधानाचा समाचार सदाभाऊ खोत यांनी घेतला. 'दादा कोंडकेंनी इच्छा माझी पुरी करा' असे नाटक केले होते. दादा कोंडके यांचा दुसरा भाग म्हणजे संजय राऊत आहेत. त्यामुळे ते इच्छा माझी पुरी करा म्हणत आहेत," असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com