Swayam Talks at Pune : तुम्ही राजकीय पक्षांबाबत बोलत असाल, तर मी हात जोडते...

Maharashtra Politics : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत कुणीही सूज्ञ माणूस चांगले बोलत नाही किंवा बोलले तरी टाळले जाते.
Swayam Talks at Pune :
Swayam Talks at Pune :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत कुणीही सूज्ञ माणूस चांगले बोलत नाही किंवा बोलले तरी टाळले जाते. असाच अनुभव रविवारी पुण्यात 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित 'स्वयं टॉक्स' या कार्यक्रमात आला. उल्लेखनीय विधायक कामांद्वारे विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या दिग्गजांच्या खडतर प्रवासाचा उलगडा या वेळी झाला. 'सरकारनामा' आणि 'पॅशन ३६०' हे या कार्यक्रमाचे प्रायोजक, तर द्वारिका लाइट अँड साऊंड, 'निमित्त' हे सहप्रायोजक होते.

पुणेकरांच्या प्रचंड गर्दीच्या साक्षीने शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. 'सकाळ माध्यम समूहा'चे सीईओ उदय जाधव, 'सरकारनामा'चे बिझनेस हेड स्वप्निल मालपाठक, द्वारिका लाइट अँड साऊंड आणि 'निमित्त'चे युवराज शिंदे, स्वप्निल शिंदे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त विकास ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती

Swayam Talks at Pune :
Maan political News : मी पवारांचा चमचा नाही; लायकी नसणाऱ्यांना... ; जयकुमार गोरेंची देशमुखांवर घणाघाती टीका !

माध्यम क्षेत्रातील आघाडीचे नाव असणारे उदय निरगुडकर यांनी भारतीय आणि जर्मन कंपन्यांमध्ये येणारे 'सांस्कृतिक अडथळे' दूर करणाऱ्या वैशाली करमरकर, मानवी वस्तीतील बिबट्याच्या अस्तित्वावर आधारित आठ शोधनिबंध प्रकाशित असलेले आणि वाइल्डलाइफ व प्रवासाची पॅशन जपणारे स्वप्निल कुंभोजकर, मराठवाड्याचे पहिले 'आयर्नमॅन' ठरलेले नितीन घोरपडे यांच्याशी संवाद साधला. (Pune News)

वैशाली करमरकर यांना निरगुडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यावर वैशाली करमरकर काय बोलतील, याची उत्सुकता मोठ्या संख्येने जमलेल्या पुणेकरांना लागली होती. मात्र, करमरकर यांनी हात जोडले. त्यांनी राजकीय परिस्थितीवर बोलण्यास नकार दिला. तुम्ही राजकीय पक्षांबाबत बोलत असाल, तर मी हात जोडते, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. प्रचंड गर्दीच्या साक्षीने रंगलेल्या या कार्यक्रमात यामुळे हशा पिकला.

आपल्या जीवनातील चढउतारानंतर मिळवलेल्या यशाची गुपिते वैशाली करमरकर, स्वप्निल कुंभोजकर, नितीन घोरपडे यांनी प्रचंड गर्दीसमोर उलगडून दाखवली. आपल्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी पुणेकरांसोबत शेअर केले. वरचेवर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात निरगुडकर यांनी वैशाली करमरकर यांना सध्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलते करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, करमरकर यांनी त्यांच्यासमोर हात जोडले. या कार्यक्रमाला कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांपासून दिग्गज व्यक्तिमत्त्वांपर्यंत सर्वच क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांच्या खडतर प्रवासाच्या अनुभवसंपन्न माहितीचे साक्षीदार झालेले पुणेकर भारावून गेले. २०१४ मध्ये एक प्रयोग म्हणून सुरू झालेले 'स्वयं टॉक्स' आता एक चळवळ बनली आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजातील कल्पक व्यक्तिमत्त्वांसह यशस्वी नवउद्योजकांसोबत सर्वसामान्यांचा संवाद घडवून आणला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Swayam Talks at Pune :
Mahur Market Committee Elections Result : माहूर बाजार समितीवर प्रदीप नाईकांचे वर्चस्व; भाजप, काँग्रेसचा धुव्वा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com