
Pune News : अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. या हल्लेखोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलs असून हा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हल्ल्यामध्ये बांगलादेश कनेक्शन आल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागलं असून यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले, सैफ अली खानचा विषय भलतीकडे वळवू नका. हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. त्यातून समोर येईलच. मात्र बाबा सिद्दीकी यांच्याबाबतीत पण तसंच झालं.
सिद्दीकींचा मुलगा त्यांच्या वडिलांचा खून करणारे आरोपी वेगळेच आहेत, यामध्ये बिल्डर लॉबीचा हात असू शकतो, असं सांगत असले तरी त्याच्या कडे सरकार लक्ष देत नाही. तसंच सैफ अली खानच्या बाबतीत देखील. हे प्रकरण दुसरीकडे नेण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा रोहित पवारांनी केला.
नेते, कलाकार, सेलिब्रिटी सेफ नाहीत, हा विषय सुरू असतानाच त्याच्यावरती चर्चा होणे आवश्यक आहे. त्याबाबत कुठेतरी राजकीय नेत्यांचे ऐकून हा तपास आता बांगलादेशकडे घेऊन जातं आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे हा विषय तिकडे नेला जातोय, असा आरोप रोहित पवारांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, दावोसमध्ये करार करताना बाहेरच्या कंपन्यासोबत करार करावा. मुंबईत कंपन्यांचे ऑफिस आहे, त्यांच्याशी करार करू नका. आकडा फुगवून सांगू नका, डेटा घेऊन आम्ही विश्लेषण करू, असं रोहित पवार म्हणाले.
नवनिर्वाचित सर्व आमदारांना सरकारकडून बॅगा देण्यात येणार आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप होत आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, एकीकडे शेतकऱयांच्या कुटूंबाना मदत दिली जात नाही, तर दुसरीकडे आमच्यासारख्या आमदारांना वीस हजार किंमतीच्या बॅगा दिल्या जाणार आहेत. यामध्ये सरकारचा करोडो रुपये त्यावर खर्च होणार आहे. हे डिजिटलचे युग आहे. वायफळ खर्च बंद करावा आणि सामान्य लोकांसाठी तो वापरावा, अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी बॅग घेणार नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेमध्ये बदल होणार का, याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, सर्वच पक्षात फेरबदल होणार आहेत, आमच्या पक्षात देखील फेरबदल होणार आहेत. यापूर्वी जयंत पाटील आणि शरद पवार यांची बैठक झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.