Pune political meeting: पुण्यातील बैठकीत महायुतीच्या नेत्यांना दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना; बावनकुळेंनी सांगितले किती टक्के मतदान मिळणार?

Mahayuti leaders instructions News : सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यातील सत्ताधारी महायुती म्हणून एकत्रित लढणार की स्वबळाचा नारा देणार याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कोणत्याही महायुतीच्या नेत्याने मिठाचा खडा पडेल, असे वक्तव्य करू नका सूचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. शनिवारी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडल्या. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सध्या पुण्यामध्ये महायुतीच्या मित्र पक्षातील नेत्यांमध्ये गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर हे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर त्या टीकेला उत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष देखील धंगेकरांना ठोकून काढायची भाषा करत आहेत. यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडत असल्याचा पाहायला मिळत आहे.

Chandrashekhar Bawankule
Shivsena- BJP News : सत्तेत एकत्र पण मनं जुळलीच नाही; स्थानिकसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा, शिवसेनेला मात्र हवी युती!

या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) यांनी महायुतीतील नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. बावनकुळे म्हणाले, 'आज पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय बैठक सुरू आहे. या बैठकीला तीन हजार पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्त्वाच्या असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून राज्यात 51 टक्के मतदान घेऊन विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.

Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray News : इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज ही तर थाप! उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या जातील तसेच महायुतीमध्ये भाजप हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कोणतेही मनभेद होऊ नये आणि त्याबाबत कोणीही बोलू नये यासाठी संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule
Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

पुणे शहरासह इतर ठिकाणीही आणि सगळ्यांना सांगितले आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल, असे स्टेटमेंट करू नका. माईकवर भाषणे करताना मिठाचा खडा टाकू नका, अशा सूचना सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule
Yogesh Kadam update : घाबरू नका... एकनाथ शिंदेंचं योगेश कदमांना अभय : सोबत जेवण करताना काय चर्चा झाली?

त्यामुळे येत्या काळात भाजपकडून तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्य होणार नाहीत, असे देखील बावनकुळे यांनी केला आहे. आम्ही स्वबळाची तयारी करत नसून महायुती म्हणूनच लढणार असल्याचा देखील त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Yogesh Kadam : घायवळ प्रकरण : मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी, योगेश कदमांची हकालपट्टी करा; अन्यथा थेट… अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com