Sambhaji Bhide Controversial Statement : भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ''15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही, तर...''

Maharashtra Politics : '' जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत...''
Sambhaji Bhide News
Sambhaji Bhide NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांच्या एका विधानामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. भिडे यांनी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी देशाची फाळणी झाली होती. तो काळा दिवस असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे.

पुण्यातील दिघी येथे रविवारी (दि.२५ ) संभाजी भिडें(Sambhaji Bhide)चं जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली. यादिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा असंही भिडे म्हणाले आहेत.

Sambhaji Bhide News
KCR In Maharashtra : केसीआर महाराष्ट्रात तर काँग्रेस तेलंगणात करणार कोंडी: निवडणुकीसाठी मोठी रणनीती

भिडे म्हणाले, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही. यादिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य पण ते हांडगं स्वातंत्र्य असेल. ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून 9 च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. छोटासा तिरंगाही दखलपात्र म्हणून घ्यावा असे विधान त्यांनी केले.

जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीविषयीही आक्षेपार्ह विधानही संभाजी भिडे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

Sambhaji Bhide News
Sujay Vikhe Patil News : ''...तरच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळेल !''; खासदार विखेंनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

फडणवीस काय म्हणाले ?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, भारताला राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे, भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र दिवस आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टिप्पणी..

महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने देखील भिडे यांना नोटीस पाठवली होती. तसेच टिकलीबाबत केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा असं म्हटलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.