गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? ः संजय राऊत

पुणे वडगाव शेरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार फटकेबाजी केली.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : दिल्लीतसुद्धा आमची सत्ता येणार आहे. आम्ही जेव्हा दिल्लीत सत्ता येणार म्हणतो, तेव्हा ती येणार म्हणजे येणारच. गुजरातचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मग महाराष्ट्राचा का नाही? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यात बोलताना केला.

Sanjay Raut
चंद्रकांत पाटलांवर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार: संजय राऊत

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी येथे रविवारी (ता. २६ सप्टेंबर) शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात राऊत बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी नेहमीप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व जो करतो, तो मोठा नेता असतो.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाच्या दाव्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, चंद्रकात पाटलांवर मी त्यांच्या ऐपतीनुसार सव्वा रूपयाचा दावा लावला आहे आणि सव्वा रूपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. देशाच्या इतिहासातील हा सर्वात कमी रकमेचा दावा आहे. मात्र, मी तो सव्वा रूपया जाहीरपणे घेणारच आहे, कारण मी कुठलाही खटला हरत नाही, तो राजकीय असेल किंवा कोर्टातील असो. मी राजकारणातसुद्धा दोन वर्षांपूर्वी राज्यातील मुख्यमंत्री शिवसेनेचा करून भाजपला हरवले आहे. मला तुमचे शंभर कोटी नकोत. बाळासाहेबांनी मला सर्वकाही दिले आहे. चंद्रकांतदादा म्हणाले की संजय राऊतांनी त्यांची किंमत वाढवावी. पण, आमची किंमत काय आहे ते मी आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वीच तुम्हाला दाखवली आहे, असा चिमटासुद्धा त्यांनी पाटील यांना काढला.

Sanjay Raut
राऊत आणि पाटील यांच्यातील सव्वा रुपयाचे भांडण!

पुणे महापालिकेवर भगवा फडकवायची वेळ आली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. आदित्य शिरोडकर आणि सचिन यांना आहेर शहराची जबाबदारी दिली आहे. शिवसेनेचे उमेदवार पडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. पण, शिवसेनेचे कोणीही काहीही वाकडं करु शकणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com