Vaibhavi Deshmukh HSC Result : वडिलांच्या हत्येनंतर बारावीची परीक्षा दिलेली वैभवी निकाल लागताच गहिवरली!रडत रडत म्हणाली,...

HSC Result Vaibhavi Deshmukh Reaction : माझ्या करिअरची परीक्षा मी पास झाले तरी पण माझ्यासाठी वडिलांना न्याय मिळवून देणे ही माझी प्राथमिकता असणार आहे. आमच्यासाठी जे काही होते ते आमचे वडीलच होते.
Vaibhavi Deshmukh celebrates her 85% in Class 12, emotional as she remembers her father Santosh Deshmukh.
Vaibhavi Deshmukh celebrates her 85% in Class 12, emotional as she remembers her father Santosh Deshmukh.sarkarnama
Published on
Updated on

Vaibhavi Deshmukh Result : बारावीचा निकाल आज जाहीर झाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने तब्बल 85.33 टक्के गुण मिळवले. वडिलांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून वैभवी महाराष्ट्रभर फिरत होती. आज निकाल जाहीर होताच ती वडिलांच्या आठवणीने भावूक झाली.

वैभवी म्हणाली, 'मला याचं दुःख वाटतंय की माझे वडील माझ्यासोबत नाही. ते जर असते तर त्यांना हा निकाल ऐकुण फार आनंद झाला असता. त्यांच्या शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती. देशमुख कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर दुखःचा डोंगर कोसळला होता. पेपर देणं मला शक्य नव्हतं. सगळ्यांनी मला सांगितलं की तुला तुझ्या करियरकडे लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर मी बारावीची परीक्षा दिली होती.'

Vaibhavi Deshmukh celebrates her 85% in Class 12, emotional as she remembers her father Santosh Deshmukh.
Vaibhavi Deshmukh HSC Result : संतोष देशमुखांच्या जिद्दी लेकीनं आपल्या ‘गुणां’नी महाराष्ट्राला जिंकलं! वैभवीचा बारावीचा निकाल जाहीर...

'माझे वडील होते तेव्हा स्वप्न खुप वेगळे होते. माझी नेटची तयारी सुरू होती. या निकालाने स्वप्न पूर्ण झालं असले तरी त्यात माझे वडील माझ्यासोबत नाही हे दुख:आहेच. एकीकडे आनंद वाटतोय तर एकीकडे दुःख वाटत आहे', असे सांगताना वैभवीचे डोळे पाणावले.

वडिलांना न्याय मिळावा...

'माझ्या करिअरची परीक्षा मी पास झाले तरी पण माझ्यासाठी वडिलांना न्याय मिळवून देणे ही माझी प्राथमिकता असणार आहे. आमच्यासाठी जे काही होते ते आमचे वडीलच होते. आता ते नाहीत पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जे मला काही करावे लागेल ते मी करेल.', असे देखील वैभवीने सांगितले.तसेच आपण नेटची परीक्षा दिली होती पण पेपर आपल्याला अवघड गेला. सीईटीचा निकाल लागल्यानंतर करिअरची पुढची दिशा ठरवू, असे देखील वैभवीने सांगितले.

Vaibhavi Deshmukh celebrates her 85% in Class 12, emotional as she remembers her father Santosh Deshmukh.
Satara Politic's : जयकुमार गोरेंच्या बदनामीचं प्रकरण रामराजेंनीच शिजवलं अन्‌ वाढवलं; भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com