Ambegaon News : थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जुमानेनात!

जनतेतून निवडून आलेले सरपंच पवन हिले यांनी राजीनामा द्यावा : अवसरी बुद्रूकच्या ग्रामसभेत ठराव
Avasari Budruk'Gram Sabha
Avasari Budruk'Gram SabhaSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच (Sarpanch) गावासाठी वेळ देत नाहीत. ग्रामसभा, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना कायम दांडी मारतात. ग्रामविकास अधिकारी यांच्या सहाय्याने मनमनी पद्धतीने काम करतात. नवनिर्वाचित सरपंच हे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, त्यांना ते जुमानत नाहीत, अशी स्थिती आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील अवसरी बुद्रूक येथे निर्माण झाली आहे. (sarpanch Pawan Hille should resign: resolution in Gram Sabha of Avasari Budruk)

सरपंच गावासाठी वेळ देत नाही, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठक तसेच, ग्रामसभेला सतत गैरहजर राहतात. त्यामुळे सरपंच पवन हिले यांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा, तसेच सहीचे अधिकार उपसरपंचांना द्यावेत. तसेच, ग्रामविकास अधिकारी मोहन गर्जे मनमानी कारभार करत असून, महिला ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्वसामान्यांना जुमानत नाही. त्यांच्या मनमानीमुळे गावातील विकासकामे रखडली आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांची तातडीने बदली करावी, अशा मागणीचा ठराव अवसरी बुद्रूकच्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

Avasari Budruk'Gram Sabha
Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष तथा पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांचे हे अवसरी बुद्रूक गाव. ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून पक्षाच्या वतीने लोकनियुक्त सरपंच म्हणून पवन हिले निवडून आले आहेत. त्यानंतरही सरपंच हिले हे हिंगे तसेच ग्रामस्थांनासुद्धा जुमानत नाहीत. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला गैरहजर राहतात, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व सहीचे अधिकार उपसरपंचांना द्यावेत. ग्रामविकास अधिकारी मोहन गर्जे मनमानी कारभार करत आहेत. महिला ग्रामपंचायत सदस्य व सर्वसामान्यांना जुमानत नाहीत. तसेच, महिलांची ग्रामसभाही घेत नाहीत. त्यामुळे ग्रामसभेत महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Avasari Budruk'Gram Sabha
Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे अडचणीत? भाजपने पाठिंबा दिल्याचा संभाजीराजेंच्या उमेदवाराचा दावा

गावातील मंजूर विकास कामांची वर्क ऑर्डर काढत नसल्याने काही कामांचा निधीही परत गेला आहे, त्यामुळे विकास कामांना खेळ बसली. मंजूर झालेली लाखो रुपयांची विकास कामे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्यात एकमत नसल्याने वेळेत कामांची वर्क ऑर्डर न काढल्याने रद्द झाली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Avasari Budruk'Gram Sabha
India Today-C Voter Survey : देशात आठव्या स्थानी; मात्र, महाराष्ट्राच्या जनतेची पसंती मुख्यमंत्री शिंदेंना मिळेना!

ग्रामसभेस विष्णू हिंगे, उपसरपंच शीतल हिंगे, माजी उपसरपंच सचिन हिंगे, किशोर हिंगे, ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, कल्याण हिंगे, अनिल हिंगे, सर्जेराव हिंगे, गुलाब हिंगे, प्रशांत वाडेकर, संजय चव्हाण ,भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com