PCMC Maratha Reservation News : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन करणाऱ्या सतीश काळेंची प्रकृती खालावली !

Sambhaji Brigade: काल रात्री उशिरा काळेंची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषणस्थळीच डॉक्टरांनी सलाइन लावले.
Sambhaji Brigade:
Sambhaji Brigade: Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड,जि. जालना) येथे आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा आज त्याचा तेरावा दिवस आहे, तर त्यांना पाठिंबा म्हणून तसेच तेथे झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनीही जरांगेसारखेच उपोषण ७ सप्टेंबरपासून सुरूर केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने समन्वय समितीच्या निर्णयामुळे त्यांनी काल रात्री (ता.१०) उशिरा ते मागे घेतले.

दरम्यान, काळेंचं वजन तीन दिवसांत तीन किलोने कमी झाल्याचे दिसून आले. बीपी १६० एवढा वाढला, तर शुगर साठपर्यंत खाली आल्याने त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपोषण सोडल्यानंतर काल रात्रीच दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी आज सांगितले. काळेंना पाठिंबा म्हणून त्यांच्यासोबत मराठा मोर्चाचे काही कार्यकर्तेही चक्री उपोषण पिंपरी चौकात करीत होते.

Sambhaji Brigade:
Nagpur MNS News : मारबतपूर्वीच ‘एनआयटी’वर निघणार मनसेचा बडगा, पुराव्यांनिशी करणार पोलखोल !

तिसऱ्या दिवशी काल रात्री उशिरा काळेंची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषणस्थळीच डॉक्टरांनी सलाइन लावले. त्यांना शुगर आहे. ती खूपच खाली आली होती, तर बीपी वाढल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला समन्वय समितीला दिला. समितीने एकमताने काळेंचे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती, कॉंग्रेस व मनसेचे शहराध्यक्ष अनुक्रमे डॉ. कैलास कदम आणि सचिन चिखले आदींच्या उपस्थितीत काळेंनी उपोषण मागे घेतले. "बचेंगे तो और भी लढेंगे" अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com