Satish Murder Case Big Update: सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना 'या' ठिकाणाहून उचललं

Pune Satish Wagh Kidnapping And Murdered Case : सतीश वाघ यांच्या अंगावरती तीक्ष्ण हत्याराने वार केले असल्याचं दिसून आलं. तसंच त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडके देखील आढळून आले. या लाकडी दांडक्याच्या साह्याने वाघ यांच्या डोक्यावरती आघात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Satish Wagh .jpg
Satish Wagh .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास उरळीकांचन येथील शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांकडून याबाबत युद्धपतळीवर तपास करण्यात येत होता. आता पोलिसांना तपासामध्ये मोठं यश आलंं आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर सकाळच्या सुमारास वाघ हे थांबले असताना सोमवारी (ता.9) चारचाकी गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ (Satish Wagh) यांना गाडीत बसवून सोलापूरच्या दिशेने ते गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले होते.

या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासाची वेगाने सूत्रे फिरवत जवळपास 10 ते 12 पथकं वाघ यांच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. मात्र, अखेर अपहरण करण्यात आलेल्या वाघ यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर अली.

Satish Wagh .jpg
Beed Crime News : सरपंचाच्या खुनानंतर व्यापाऱ्याच्या अपहरणाची घटना, बीडचा बिहार होतोय का?

सोमवारी सायंकाळी शिदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. काही नागरिक शिंदवणे घाटातून जात असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सतीश वाघ यांच्या अंगावरती तीक्ष्ण हत्याराने वार केले असल्याचं दिसून आलं. तसंच त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडके देखील आढळून आले. या लाकडी दांडक्याच्या साह्याने वाघ यांच्या डोक्यावरती आघात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकून अपहरण करते पसार झाले.

Satish Wagh .jpg
Pune Congress Politics : बंडखोरी केलेल्यांची घरवापसी होणार! बागुल म्हणाले, 'पक्षशिस्त मोडलीच नाही, तर निलंबन कसे?'

अपहरण केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून झाला असण्याची शक्यता आहे. पोलिसांची १६ पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या टेक्निकल डाटाच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसकडून करण्यात आले.

पोलिसांच्या राबवण्यात आलेल्या या मोहिमेला यश आले असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अद्याप हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. दोघांनाही वाघोली परिसरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com