Delhi Politics : दिल्लीत 'ऑपरेशन लोटस?' आपच्या आमदारांना 25 कोटी अन् भाजप तिकीटाची ऑफर?

Aam Adami Party Allegation On BJP : "आमच्या सात आमदारांशी संपर्क केल्याचे आमच्याकडे पुरावे.."
Delhi Politics
Delhi Politics Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष टिपेला पोहचला आहे. आमचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असून, भाजपने'ऑपरेशन लोटस'चालवले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मंत्री आतिशी म्हणाल्या, 'आमच्या सात आमदारांशी संपर्क साधला जात आहे. आमच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटींचे ऑफर दिल्याचे, आतिशी यांनी दावा केला आहे. (Latest Marathi News)

Delhi Politics
AAP National Party : दहा वर्षात 'आप'ची राष्ट्रीय पक्ष म्हणून झेप; कसा आहे आम आदमी पार्टीचा प्रवास?

मंत्री आतिशीच्या आरोपानंतर केजरीवाल यांनी ऑपरेशन लोटसचाही दावाही केला आहे. मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाले, 'अलीकडेच त्यांनी (भाजप) आमच्या दिल्लीतील सात आमदारांशी संपर्क साधला आहे. आम्ही केजरीवालांना काही दिवसांतच अटक करू. त्यानंतर आपचे एक-एक आमदार फोडू. आतापर्यंत 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. असे ते सांगत आहेत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. 25 कोटी आणि भाजपचं तिकिट अशी ऑफर आमच्या आमदारांना देण्यात येत आहे, असे केजरीवाल म्हणाले. (Operation Lotus News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Delhi Politics
Enforcement Directorate : 'ईडी'ने वाढविल्या अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी...

आमच्याकडे पुरावे -

पक्ष कशाच्या आधारावर भाजपवर आरोप करत आहे, असे विचारले असता, दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले की, 'भाजप नेत्याने 'आप'च्या आमदाराशी संवाद साधल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबद्दल आणि आमदारांच्या खरेदीबद्दल यात माहिती दिली आहे. हे रेकॉर्डिंग लवकरच सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेकॉर्डिंगमध्ये एका भाजप नेत्याला अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल आणि त्यांच्या अटकेनंतर तुम्ही सरकार पाडू असे, असे म्हटल्याचे पुरावे आमच्याकडे आहे.

सरकार पाडण्याचा प्रयत्न -

दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "मला कोणत्याही कथित मद्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अटक केली जात आहे, असे नाही. दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश आले नाही आणि भविष्यातही येणार नाही."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com