Gram Panchayat Election : सुनील अण्णांचा पुन्हा भेगडेंना धोबीपछाड; बारणेंना खातेही उघडता आले नाही

Gram Panchayat Election : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली
Gram Panchayat Election, bala bhegade, Sunil Shelke
Gram Panchayat Election, bala bhegade, Sunil Shelke Sarkarnama
Published on
Updated on

Gram Panchayat Election : रविवारी (ता.१८) राज्यभर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज (ता.२०) लागले. त्यात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) बाजी मारली. जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निवडणूक झालेल्या नऊपैकी सात ग्रामपंचायतीवर घड्याळाने टिकटिक केली. मावळच्या आजी, माजी आमदारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्ममान आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी बाजी मारली आहे. तर शिंदे गटाची पाटी, मात्र कोरी राहिली.

पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा हे स्वत मावळात ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी येऊन गेले होते. मात्र, ज्या गावात त्यांनी प्रचार केला, त्या निगडेत राष्ट्रवादीचा सरपंच निवडून आला, हे विशेष. दरम्यान, या निवडणूक निकालातून भाजपचा (BJP) गड असलेला मावळ तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनू लागला आहे. त्याची सुरवात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली.

Gram Panchayat Election, bala bhegade, Sunil Shelke
Grampanchayt Result : दानवेंनी ग्रामपंचायत राखली, भावजय विजयी, तिकडे मेव्हणाही जिंकला..

तिथे पहिल्यांदा भाजपच्या या गडाला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आणि त्यांचे उमेदवार आणि राज्यमंत्री बाळा भेगडेचा शेळकेंनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर मतदारसंघातील नवनिर्मित श्री क्षेत्र देहू नगरपालिकाही राष्ट्रवादीने बहूमताने जिंकली. मावळातील नऊ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यातील शिरगावची निवडणूक बिनविरोध झाली. तेथे राष्ट्रवादीने पहिली टिकटिक केली. तर, मतदान झालेल्या आठपैकी भोयरे आणि गोडूंब्रे इथे कमळ फुलले.

बाकी देवले, इंदोरी, कुणेनामा, वरसोली, निगडे आणि सावळा येथे घड्याळाचा गजर होऊन तेथे राष्ट्रवादीचे सरंपच झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे भाजपच्या बाळा भेगडेंबरोबर हा निकाल बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) यांनाही धक्का आहे.

Gram Panchayat Election, bala bhegade, Sunil Shelke
Grampanchayat Election : हंसराज अहिरांच्या प्रयत्नांनंतरही सावळीमध्ये भाजपचा दारूण पराभव

भुलथापांना बळी न पडता जनतेने तालुक्यात सुरु केलेली विकासकामे आणि जनसंपर्काला पावती दिल्याची प्रतिक्रिया शेळके यांनी या निकालावर दिली. तर, शेळकेंच्या विकासाच्या झंझावाताला मतदारांनी दिलेली ही साथ व दाद असल्याचे राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com