Sharad Mohol Case : स्वाती मोहोळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; ससूनमधून गेला होता पळून...

Police took custody : पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी घेतले ताब्यात.
Marshall Lewis Leelakar
Marshall Lewis LeelakarSarkarnama

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आणि ससून हॉस्पिटलमधून पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी अटक केली. 11 फेब्रुवारीला हा ससून हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.

कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गेल्या महिन्यात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जुनी भांडणे आणि आर्थिक व्यवहार यामधून मोहोळ याचे साथीदार असलेल्या व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. भर दिवसा सुतारदरा परिसरात मोहोळ याचा खून करण्यात आल्याने या घटनेने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Marshall Lewis Leelakar
Shivsena Mahaadhiveshan : जावयामुळे सासऱ्यांची अडचण; महाअधिवेशनात शहाजीबापूंचा फोटो गायब...

मोहोळ याच्या हत्येनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांना फोनवर धमकी देण्यात आली होती. स्वाती मोहोळ यांना राजकीय पार्श्वभूमी असून, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. स्वाती मोहोळ यांना धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून तपास करून पोलिसांनी मार्शल लुईस लीलाकर याला अटक केली होती. गेल्या आठवड्यात छातीत दुखत असल्याची तक्रार मार्शल लुईस याने केल्याने पोलिसांनी त्याला ससूनमध्ये आणले होते. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून तो ससूनमधून पळून गेला होता.

अटक आरोपी ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याने या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा समोर येत होता. यामध्ये पोलिसांवर टीकादेखील झाली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके तयार करून सर्वत्र पाठवली होती. येरवडा परिसरातून शनिवारी पहाटे आरोपी मार्शल लुईस याला अटक करण्यात आली. सायबर पोलिस स्टेशनने ही कारवाई केली.

आरोपी त्याच्या मावशीला भेटण्यासाठी येरवडा परिसरात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सायबर पोलिसांनी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नेरळ, कर्जत भागात त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके पाठविली होती.

(Edited by Amol Sutar)

R

Marshall Lewis Leelakar
Manoj Patil Hunger Strike: मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषण करण्यास भाग पाडले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com