Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ खून प्रकरण; दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ

Pune Police : पोलिसांना मोक्कानुसार गुन्हा दाखल असेल तर ३० दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते. मोक्का नसेल इतर गुन्हांमध्ये केवळ 14 दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते.
Sharad Mohol Case
Sharad Mohol CaseSarkarnama
Published on
Updated on

Sharad Moho Murder Case Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ याला पाच जानेवारीला गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी 15 आरोपींवर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी न्यायालायने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदत वाढ दिली आहे. दोषारोप पत्र दाखल ९० दिवसांची वाढ मिळाली यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला होता.

Sharad Mohol Case
Demonetisation News : नोटबंदी म्हणजे काळा पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचं चांगलं मार्ग... ; सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत!

कोथरुडमधील सुतारदार परिसरात शरद मोहोळच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार आहेत. यांच्यासह पोलिसांनी 16 जणांना अटक करत मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल केला . आरोपी गणेश मारणे वगळता इतर 15 आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळाली यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) पुणे पोलिसांनी दोन गवकिलांनाही अटक केली होती. ते दोघेही वकील शिवाजीनगर कोर्टात वकिली करतात. आरोपींमध्ये त्यांचा देखील समावेश आहे. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले,ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.

का मिळाली मुदतवाढ?

पोलिसांना मोक्कानुसार गुन्हा दाखल असेल तर ३० दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते. मोक्का नसेल इतर गुन्हांमध्ये केवळ 14 दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते. मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल असेल तर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांची मुदत मिळते. त्यातील 90 दिवस संपण्यापूर्वी मुदतवाढीचा अर्ज करणे गरजेचे असते.Pol

(Edited By Roshan More)

Sharad Mohol Case
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर टीका; ...म्हणाल्या, 'विरोधी उमेदवाराची चिंता नाही'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com